_1659706549663.jpg)
हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्यासह टीम इंडियाचे काही खेळाडू शेवटचे दोन टी-20 सामने खेळण्यासाठी मियामीला पोहोचले होते. वेस्ट इंडिजसोबतच्या सामन्याला दोन दिवसांचा वेळ आहे. त्यामुळे खेळाडूंनी मियामी बीचवर काही वेळ घालवला.
सूर्यकुमार यादवने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पत्नी देवीशा शेट्टी सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. टीम इंडियाचा हा फलंदाज खूपच रोमँटिक मूडमध्ये दिसत आहे.
कुलदीप यादवने त्याच्या इन्स्टास्टोरीमध्ये स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो काळा चष्मा लावलेला दिसत आहे. कुलदीपने काळ्या रंगाचे शॉट्स आणि आकाशी रंगाचा टी-शर्ट घातला आहे.
टीम इंडिया फ्लोरिडामध्ये पाचव्यांदा विंडीजशी भिडणार आहे. याआधी भारतीय संघाने फ्लोरिडामध्ये पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामने जिंकले आहेत. तर एक सामना विंडीजने जिंकला होता. तसे एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.
सूर्यकुमार यादवने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये तो लाल रंगाचा टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट्समध्ये दिसत आहे. सुर्याने फोटोसाठी शानदार पोजही दिल्याचे दिसत आहे.
टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंना सततच्या क्रिकेटमधून ब्रेक मिळाला आहे. त्यामुळे सर्वांनी या सुट्टीचा चांगलाच आनंद लुटला. या खेळाडूंनी मियामी बीचवर जवळपास तीन तासांहून अधिक वेळ घालवला.

_1659706718128.jpg)

_1659707250347.jpg)
_1659707279673.jpg)