टीम इंडियाने बेंगळुरू कसोटी ८ विकेट्सनी गमावली. त्यानंतर पुण्यात न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा सामना ११३ धावांनी गमावला. आता मुंबईत खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटीतही न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. वानखेडे स्टेडियमवर भारताला विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. चौथ्या डावात किवींच्या गोलंदाजीसमोर टीम इंडिया १२१ धावांवर गारद झाली.
(PTI)मुंबई कसोटीनंतर टीम इंडियाच्या नावावर अनेक लाजिरवाणे विक्रम झाले आहेत, ज्याचा टीम इंडियाने कधी विचारही केला नसेल. अशाच ५ लाजिरवाण्या रेकॉर्डबद्दल आपण येथे जाणून घेणार आहोत.
(PTI)मायदेशात पहिल्यांदात ३ सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप- भारतीय संघाला पहिल्यांदाच घरच्या मैदानावर ३ किंवा त्याहून अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप मिळाला आहे. याआधी ९२ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात कधीही असे घडले नव्हते. टीम इंडियाला यापूर्वी २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या मालिकेत २-० पराभूत केले होते.
(PTI)किरकोळ लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही- भारतीय संघाला विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य होते. यानंतरही भारताला सामना जिंकता आला नाही. घरच्या मैदानावर कसोटी इतिहासातील चौथ्या डावातील हे सर्वात छोटे लक्ष्य आहे, ज्याचा पाठलाग टीम इंडिया करू शकली नाही.
(AFP)न्यूझीलंडने प्रथमच मायदेशाबाहेर सलग तीन कसोटी जिंकल्या- न्यूझीलंड संघ घरच्या मैदानावर उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखला जातो. पण मायदेशाबाहेर त्यांचा रेकॉर्ड नेहमीच खराब राहिला आहे. पण यावेळी न्यूझीलंडने भारतीय मैदानावर भारताचा पराभव केला. आपल्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच न्यूझीलंडने घराबाहेर सलग ३ कसोटी जिंकल्या आहेत.
(PTI)न्यूझीलंडने पहिल्यांदाच एका मालिकेत तीन सामने जिंकले- न्यूझीलंड संघाला आपल्या कसोटी इतिहासात आतापर्यंत एका मालिकेत कधीच तीन सामने जिंकता आलेले नव्हते. बेंगळुरूमध्ये भारताचा पराभव केल्यानंतर न्यूझीलंडने पुणे आणि मुंबईतही विजय मिळवला. किवी संघाने प्रथमच एका मालिकेत तीन कसोटी जिंकल्या आहेत.
(AFP)