चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताच्या विजयाचा हिरो ठरला तिलक वर्मा. त्याने एकट्याने टीम इंडियाला विजयापर्यंत नेले. यासोबतच त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.
तिलक वर्माने ५५ चेंडूत नाबाद ७२ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. त्याच्या बॅटमधून ४ चौकार आणि ५ षटकार आले. यासोबतच तिलकच्या नावावर एक खास कामगिरी झाली.
(PTI)विशेष म्हणजे, तिलक वर्मा आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यातील गेल्या ४ डावांपासून नाबाद आहे आणि या दरम्यान ४ डावांमध्ये त्याने आता ३१८ केल्या आहेत.
(PTI)तिलकने गेल्या ४ डावात नाबाद १०७, नाबाद १२०, नाबाद १९ आणि नाबाद ७२ धावा केल्या आहेत. गेल्या चार डावांत तो नाबाद राहिला असून त्याने ३१८ धावा केल्या आहेत.
(PTI)या विक्रमांच्या यादीत मार्क चॅपमनच्या २७१ धावा, आरोन फिंचच्या २४० धावा, श्रेयस अय्यर याच्या २४० आणि डेव्हिड वॉर्नरच्या २३९ धावा आहेत.
(AP)