India vs England 1st ODI: बुमराह-शमीसमोर इंग्लिश फलंदाज फेल, भारताचा मोठा विजय
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  India vs England 1st ODI: बुमराह-शमीसमोर इंग्लिश फलंदाज फेल, भारताचा मोठा विजय

India vs England 1st ODI: बुमराह-शमीसमोर इंग्लिश फलंदाज फेल, भारताचा मोठा विजय

India vs England 1st ODI: बुमराह-शमीसमोर इंग्लिश फलंदाज फेल, भारताचा मोठा विजय

Jul 13, 2022 11:26 AM IST
  • twitter
  • twitter
  • टीम इंडियाने पहिला वनडे सामना १० विकेट्सनी जिंकला आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर इंग्लंडने दिलेले १११ धावांचे लक्ष्य भारताने १८.४ षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केले. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने आठ षटकांतच अर्धा इंग्लिश संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला होता. बुमराहने सामन्यात अवघ्या १९ धावा देत ६ गडी बाद केले.
twitterfacebook
share
(1 / 8)
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने आठ षटकांतच अर्धा इंग्लिश संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला होता. बुमराहने सामन्यात अवघ्या १९ धावा देत ६ गडी बाद केले.(Action Images via Reuters)
जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्याच षटकात दोन विकेट घेत भारताला चांगली सुरुवात करून दिली. जेसन रॉयला क्लीन बोल्ड केल्यानंतर जो रुटही शून्यावर यष्टिरक्षक ऋषभ पंतकडे झेलबाद झाला. 
twitterfacebook
share
(2 / 8)
जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्याच षटकात दोन विकेट घेत भारताला चांगली सुरुवात करून दिली. जेसन रॉयला क्लीन बोल्ड केल्यानंतर जो रुटही शून्यावर यष्टिरक्षक ऋषभ पंतकडे झेलबाद झाला. (AP)
इंग्लंडचे तीन फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. जेसन रॉय आणि जो रूटनंतर बेन स्टोक्सही शून्यावर बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला ऋषभ पंतकरवी झेलबाद केले. शमीने सामन्यात ३ गडी बाद केले. यासह शमीने वनडेत १५० बळी पूर्ण केले आहेत. त्याने जोस बटलरला आपला १५० वा बळी बनवला. शमी हा भारताकडून सर्वात कमी सामन्यात १५० बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने ८० व्या सामन्यात ही कामगिरी केली.
twitterfacebook
share
(3 / 8)
इंग्लंडचे तीन फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. जेसन रॉय आणि जो रूटनंतर बेन स्टोक्सही शून्यावर बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला ऋषभ पंतकरवी झेलबाद केले. शमीने सामन्यात ३ गडी बाद केले. यासह शमीने वनडेत १५० बळी पूर्ण केले आहेत. त्याने जोस बटलरला आपला १५० वा बळी बनवला. शमी हा भारताकडून सर्वात कमी सामन्यात १५० बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने ८० व्या सामन्यात ही कामगिरी केली.(BCCI Twitter)
भारताच्या जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी भेदक गोलंदाजी केली. त्यामुळे इंग्लंडचा संघ २५.२ षटकातच ११० धावांवर गारद झाला.
twitterfacebook
share
(4 / 8)
भारताच्या जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी भेदक गोलंदाजी केली. त्यामुळे इंग्लंडचा संघ २५.२ षटकातच ११० धावांवर गारद झाला.(Action Images via Reuters)
१११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे सलामीवर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी दमदार सलामी दिली. या सामन्यात .ा जोडीने एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. शिखर-रोहित जोडीने वन-डेत ५ हजार धावांची भागीदारी पूर्ण केली आहे. अशी कामगिरी करणारी ही जगातील चौथी सलामी जोडी ठरली आहे. यापूर्वी भारताचा सचिन तेंडुलकर-सौरव गांगुली, ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट-मॅथ्यू हेडन आणि वेस्ट इंडिजचा गॉर्डन ग्रीनिज-डेसमंड हेन्स या सलीमीच्या जोडींनी अशी कामगिरी केली आहे.
twitterfacebook
share
(5 / 8)
१११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे सलामीवर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी दमदार सलामी दिली. या सामन्यात .ा जोडीने एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. शिखर-रोहित जोडीने वन-डेत ५ हजार धावांची भागीदारी पूर्ण केली आहे. अशी कामगिरी करणारी ही जगातील चौथी सलामी जोडी ठरली आहे. यापूर्वी भारताचा सचिन तेंडुलकर-सौरव गांगुली, ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट-मॅथ्यू हेडन आणि वेस्ट इंडिजचा गॉर्डन ग्रीनिज-डेसमंड हेन्स या सलीमीच्या जोडींनी अशी कामगिरी केली आहे.(ANI)
रोहितने त्याच्या खेळीत ५८ चेंडूंचा सामना करताना ५ षटकार आणि ५ सणसणीत चौकार लगावले. त्याने नाबाद ७६ धावा केल्या.
twitterfacebook
share
(6 / 8)
रोहितने त्याच्या खेळीत ५८ चेंडूंचा सामना करताना ५ षटकार आणि ५ सणसणीत चौकार लगावले. त्याने नाबाद ७६ धावा केल्या.(ANI)
या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने आपल्या वन-डे कारकिर्दितले ४५ वे अर्धशतक पूर्ण केले.
twitterfacebook
share
(7 / 8)
या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने आपल्या वन-डे कारकिर्दितले ४५ वे अर्धशतक पूर्ण केले.(AP)
 इंग्लंडने दिलेले १११ धावांचे लक्ष्य भारताने १८.४ षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केले. लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने ७६ तर शिखर धवनने ३१ धावा केल्या. लंडनच्या ओव्हल मैदानावर हा सामना खेळवला गेला.
twitterfacebook
share
(8 / 8)
 इंग्लंडने दिलेले १११ धावांचे लक्ष्य भारताने १८.४ षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केले. लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने ७६ तर शिखर धवनने ३१ धावा केल्या. लंडनच्या ओव्हल मैदानावर हा सामना खेळवला गेला.(AFP)
इतर गॅलरीज