Ind vs Aus : वनडे वर्ल्डकपच्या आठवणी ताज्या, पॅट कमिन्सनं पुन्हा टीम इंडियाला रडवलं
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ind vs Aus : वनडे वर्ल्डकपच्या आठवणी ताज्या, पॅट कमिन्सनं पुन्हा टीम इंडियाला रडवलं

Ind vs Aus : वनडे वर्ल्डकपच्या आठवणी ताज्या, पॅट कमिन्सनं पुन्हा टीम इंडियाला रडवलं

Ind vs Aus : वनडे वर्ल्डकपच्या आठवणी ताज्या, पॅट कमिन्सनं पुन्हा टीम इंडियाला रडवलं

Jan 05, 2025 12:05 PM IST
  • twitter
  • twitter
  • India Vs Australia : ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा ३-१ असा केला. या मालिकेतील पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघाचे सेलिब्रेश करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून टीम इंडियाच्या चाहत्यांना २०२३ च्या वनडे वर्ल्डकप फायनलची आठवण झाली. 
ऑस्ट्रेलियाने १० वर्षांनंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली. सिडनी कसोटी सामन्यातील पराभवामुळे टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पोहोचण्याच्या सर्व आशाही संपुष्टात आल्या आहेत. अशा परिस्थितीत आता WTC  फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
twitterfacebook
share
(1 / 9)

भारताची फलंदाजी फ्लॉप- सिडनी कसोटी सामन्यात टीम इंडियाची अवस्था पहिल्या डावापासूनच खराब झाली होती. या सामन्यात कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु संघाने केवळ १८५ धावा केल्या. मात्र, गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी दाखवत यजमान संघाला केवळ १६१ धावांवर रोखले.
twitterfacebook
share
(2 / 9)

ऑस्ट्रेलियाची धारदार गोलंदाजी- दुसऱ्या डावातही टीम इंडियाची फलंदाजी खराब झाली. आघाडीच्या फळीतील फलंदाजांची पूर्ण निराशा झाली. अशा स्थितीत केवळ ४ धावांच्या किरकोळ आघाडीसह टीम इंडिया दुसऱ्या डावात केवळ १५७ धावांवर आटोपली. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी चौथ्या डावात केवळ १६२ धावा करण्याचे लक्ष्य होते.
twitterfacebook
share
(3 / 9)

ऑस्ट्रेलियाने १० वर्षांनंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली- ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने १० वर्षांनंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली. यापूर्वी २०१४-१५ मध्ये कांगारू संघाने भारतीय संघाचा पराभव केला होता. अशा स्थितीत एका दशकानंतर ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा BGT मध्ये चॅम्पियन बनला आहे.
twitterfacebook
share
(4 / 9)

संपूर्ण मालिकेत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व- बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत भारताविरुद्ध पर्थ वगळता इतर चारही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवले. टीम इंडियाने ब्रिस्बेनमध्ये निश्चितच दमदार पुनरागमन केले आणि पावसामुळे सामना अनिर्णित राहिला, पण यानंतर टीम इंडिया सर्व सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मागे राहिली.
twitterfacebook
share
(5 / 9)

भारतीय फलंदाजांनी लाज आणली- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या संपूर्ण मालिकेत टीम इंडियाच्या फलंदाजांना खूप त्रास सहन करावा लागला. यशस्वी जैस्वाल वगळता इतर कोणत्याही खेळाडूला फलंदाजीत आपले कौशल्य दाखवता आले नाही. 
twitterfacebook
share
(6 / 9)

नो बुमराह नो पार्टी- सिडनी कसोटीत कर्णधार जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली.
twitterfacebook
share
(7 / 9)

सिडनीमध्ये स्कॉट बोलंडने १० विकेट घेतल्या- वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंडने सिडनी कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी अप्रतिम कामगिरी केली. बोलंडने शानदार खेळ करत दोन्ही डावात एकूण १० बळी घेतले. त्यामुळेच अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने सहज विजय मिळवला.
twitterfacebook
share
(8 / 9)

जसप्रीत बुमराह मालिकावीर - या संपूर्ण मालिकेत भारतासाठी एक चांगली गोष्ट म्हणजे जसप्रीत बुमराहने अप्रतिम खेळ दाखवला. एकट्या बुमराहने संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला प्रचंड त्रास दिला आणि एकूण ३२ विकेट घेतल्या. यासाठी त्याला प्लेयर ऑफ सिरीज म्हणूनही निवडण्यात आले.
twitterfacebook
share
(9 / 9)

या पराभवासह टीम इंडिया wtc फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडली. आता दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात wtc फायनल रंगणार आहे. हा सामना ११ जूनला लॉर्ड्सवर खेळला जाईल.
twitterfacebook
share
(10 / 9)

इतर गॅलरीज