पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय हॉकी संघाने इतिहास रचला आहे. ब गटातील आपल्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ३-२ असा पराभव केला.
(AP)ऑलिम्पिकच्या हॉकी स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची १९७२ नंतरची ही पहिलीच वेळ आहे. भारताने आधीच उपांत्यपूर्व फेरीत स्थान पक्के केले आहे आणि आता ऑस्ट्रेलियाला पराभूत करून ग्रुप बी मध्ये बेल्जियमनंतर दुसरे स्थान मिळवले आहे.
(PTI)१९७२ च्या ऑलिम्पिकमध्ये हरमिक सिंग हा हॉकीचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. आता अखेर टीम इंडियाने ३-२ असा ऐतिहासिक विजय नोंदवत ५२ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.
(PTI)यावेळी हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारताने ही कामगिरी केली आहे. पहिल्या क्वार्टरमध्ये टीम इंडियाने सामन्यावर आधीच वर्चस्व राखले होते. १२व्या मिनिटाला स्ट्रायकर अभिषेकने भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली आणि अवघ्या एक मिनिटानंतर हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करून आपली ताकद दाखवली. भारताचा तिसरा गोल हरमनप्रीतने पेनल्टी स्ट्रोकवर केला आणि अखेर सामना ३-२ असा संपला.
(PTI)उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना कोणाशी?- भारत ब गटात दुसऱ्या स्थानावर राहिला आणि आता उपांत्यपूर्व फेरीत अ गटात तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी सामना होईल. तिसरे स्थान अद्याप निश्चित झाले नाही. उपांत्यपूर्व फेरीत टीम इंडियाला ग्रेट ब्रिटन किंवा जर्मनी यापैकी एकाचे आव्हान पेलावे लागणार हे निश्चित आहे.
(PTI)