Ind vs Afg World Cup 2023 : विश्वचषकात टीम इंडियाने बुधावारी अफगाणिस्तानविरुद्ध धमाकेदार विजय नोंदवला. या सामन्यात भारताने प्रथम अफगाणिस्तानला २७२ धावांवर रोखले आणि त्यानंतर आक्रमक फलंदाजी करत अवघ्या ३५ षटकांत लक्ष्य गाठले. रोहित शर्माच्या वादळी शतकाच्या बळावर भारताने ८ विकेट्सनी सामना जिंकला.
(1 / 6)
२७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी १८ षटकात १५६ धावा ठोकल्या. इशान किशन ४७ चेंडूत ४७ धावा केल्या. तर रोहित शर्माने अवघ्या ८४ चेंडूत १३१ धावा कुटल्या. हिटमॅनने आपल्या खेळीत ५ षटकार आणि १६ चौकार मारले. (PTI)
(2 / 6)
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ८ गडी गमावून २७२ धावा केल्या. त्यांच्याकडून कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने ८० धावांची तर अजमतुल्ला उमरझाईने ६२ धावांची खेळी खेळली.(Rahul Singh)
(3 / 6)
भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. त्याने १० षटकात ३९ धावा दिल्या. तर बर्थडे बॉय हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या.(PTI)
(4 / 6)
Rohit Sharma came out swinging. He raced past his half century in 30 balls Rohit ended up racing past his century in 63 balls, which shattered the record for fastest century by an Indian in the World Cup. (AFP)
(5 / 6)
या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारताचे दोन सामन्यात दोन गुण आहेत. तर न्यूझीलंडचेही दोन सामन्यात दोन गुण आहेत. पण नेट रनरेटच्या आधारे न्यूझीलंड अव्वल स्थानावर कायम आहे. (AFP)
(6 / 6)
विराटने ३५व्या षटकाच्या चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. विराटचे वनडे कारकिर्दीतील हे ६८ वे अर्धशतक ठरले. विराटने गेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ८५ धावा केल्या होत्या. भारताचा पुढचा सामना १४ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे.(AFP)