कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची कामगिरी :
एकूण सामने खेळले- ५८०, विजय- १७९, पराभव- १७८,
ड्रॉ- २२२, टाय-१
चौथ्या डावात सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज :
रविचंद्रन अश्विन- ९९ विकेट्स, अनिल कुंबळे- ९४ विकेट्स, बिशनसिंग बेदी- ६० विकेट्स, रवींद्र जडेजा आणि इशांत शर्मा – प्रत्येकी ५४ विकेट्स
(PTI)भारताने १७ मायदेशात सलग मालिका जिंकल्या : कसोटी क्रिकेटमध्ये मायदेशात भारतीय संघाचा विक्रम उत्कृष्ट राहिला आहे. भारत मायदेशात सलग १७ मालिकांपासून मायदेशात अजिंक्य आहे. टीम इंडियाने २०१२ पासून घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.
(PTI)बांगलादेशविरुद्ध भारताचा १२ वा विजय :
भारत-बांगलादेश एकूण कसोटी- १४,
भारत जिंकला- १२,
बांगलादेश जिंकला- ००,
ड्रॉ- २
(PTI)कसोटीत एका डावात ५ विकेट आणि शतक करणारे खेळाडू:
इयान बोथम- ५ वेळा, रविचंद्रन अश्विन- ४ वेळा,
गॅरी सोबर्स/मुश्ताक मोहम्मद/जॅक कॅलिस/शाकिब अल हसन/रवींद्र जडेजा – प्रत्येकी २ वेळा
(AFP)कसोटीत सर्वाधिक ५ बळी घेणारे गोलंदाज:
शेन वॉर्न- ३७ वेळा,
रिचर्ड हॅडली - ३६ वेळा,
अनिल कुंबळे- ३५ वेळा
(AP)भारताने पहिली कसोटी २८० धावांनी जिंकली- चेन्नईत खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने चौथ्या दिवशी २८० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम खेळून भारताने अश्विनच्या शानदार शतकाच्या जोरावर पहिल्या डावात ३७६ धावा केल्या होत्या.
(PTI)प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ पहिल्या डावात केवळ १४९ धावा करू शकला. यानंतर भारताकडून दुसऱ्या डावात शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी शतके झळकावली. भारताने दुसरा डाव २८७ धावांवर डाव घोषित केला.
(AFP)