यामाहा एमटी-०३: २०२५ एमटी-०३ काही दिवसांपूर्वीच जागतिक स्तरावर सादर करण्यात आली होती आणि आता त्याची भारतीय बनावटीची मोटारसायकल २०२५ च्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये सादर होणार आहे. निळ्या पट्ट्यांसह पांढरा रंग असलेल्या नवीन आइस स्टॉर्म कलर स्कीममध्ये हे सादर करण्यात आले आहे. २०२५ यामाहा एमटी ०३ मध्ये आकर्षक एलसीडी इंस्ट्रूमेंट कंसोल आहे जो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि कॉल अलर्ट सारख्या वैशिष्ट्यांसह अपडेट करण्यात आला आहे.
हिरो एक्सपल्स २१०: हीरो एक्सपल्स ही भारतीय बाजारात उपलब्ध असलेली सर्वात स्वस्त अॅडव्हेंचर टूर मोटारसायकल आहे. मात्र, स्वस्त असूनही त्याच्या विक्रीचे आकडे चांगले नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे हायवे टूरिंगच्या दृष्टीने ताकदवान नसलेली त्याची पॉवरट्रेन. यासाठी कंपनीने एक्सपल्सला २-व्हॉल्व्ह सेटअपवरून ४-व्हॉल्व्ह सेटअपमध्ये अपग्रेड केले आहे, ज्यामुळे आउटपुटमध्ये किंचित सुधारणा झाली आहे. आता कंपनी या इव्हेंटमध्ये आपले अपग्रेड मॉडेल सादर करणार आहे.
टीव्हीएस अपाचे आरटीएक्स ३१०: टीव्हीएस अपाचे आरटीएक्स ३१० च्या रूपात एक नवीन मिडलवेट अॅडव्हेंचर मोटरसायकल भारतीय बाजारात सादर करणार आहे. ही बाईक नुकतीच कॅमोफ्लेजसोबत टेस्टिंग करताना दिसली आणि इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
यामाहा एक्सएसआर १५५: यामाहा नवी दिल्लीयेथे होणाऱ्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये एक्सएसआर १५५ सादर करण्याची योजना आखत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बाईक भारतीय बाजारात लगेच लॉन्च होणार नसली तरी ग्राहकांचा फीडबॅक जाणून घेण्यासाठी यामाहा आपल्या देशात आणत आहे.