केपटाऊन येथे खेळल्या जात असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात भारताच्या नावावर नकोशा विक्रमांची नोंद झाली.
(1 / 5)
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. या सामन्यातील पहिल्या डावात भारताने शून्यावर सहा विकेट गमावल्या आहेत. यापूर्वी कोणत्याही संघाचे सहा खेळाडू सलग शून्यावर बाद झाले नाहीत.
(2 / 5)
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कधीही एका संघाने शून्य धावांवर सहा विकेट गमावल्या नाहीत. अनेक वेळा शून्य धावांवर पाच विकेट पडल्या. तसचे सर्वाधिक वेळा शून्य धावांवर सर्वाधिक वेळा चार विकेट पडल्या आहेत. ही संख्या 40 पेक्षा जास्त आहे.
(3 / 5)
आज भारताने शून्य धावांवर सहा विकेट्स गमावल्यामुळे इंग्लंडची २४ वर्षे जुन्या नकोशा विक्रमातून सुटका झाली आहे. इंग्लंडने १९९० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन धावांत त्यांचे शेवटचे सहा विकेट गमावले होते.
(4 / 5)
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच कोणत्याही संघाच्या शेवटच्या पाच फलंदाजांपैकी एकालाही एकही धाव करता आली नाही. रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि मुकेश कुमार एकही धाव करू शकले नाहीत.
(5 / 5)
केपटाऊनमध्ये आज पहिल्या डावात भारताच्या सहा फलंदाजांना एकही धाव करता आली नाही. कसोटी इतिहासात शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांची सर्वाधिक संख्या सहा आहे.