मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Desert Knight : संयुक्त अरब अमिरातच्या आकशात डेझर्ट नाईटचा थरार! भारतीय सुखोई, मिग विमानांच्या चित्तथरारक कवायती

Desert Knight : संयुक्त अरब अमिरातच्या आकशात डेझर्ट नाईटचा थरार! भारतीय सुखोई, मिग विमानांच्या चित्तथरारक कवायती

Jan 25, 2024 09:01 AM IST Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • twitter

  • Desert Knight air exercise over Arabian Sea : भारत, फ्रान्स आणि आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) च्या हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी २३ आणि २४ जानेवारी रोजी अरबी समुद्रात संयुक्त सराव केला. या सरावात भारतीय वैमानिकांनी सुखोई, जग्वार, मिग विमाने उडवून चित्तथरारक कवायती केल्या.

भारतीय हवाई दलाने संयुक्त अरब अमिरात येथे आयोजित डेझर्ट नाइट या युद्ध सरावात सहभाग घेतला. यात भारतासोबतच  फ्रेंच हवाई दल आणि  युक्त अरब अमिराती (UAE) हवाई दलानेही सहभाग घेतला.  
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

भारतीय हवाई दलाने संयुक्त अरब अमिरात येथे आयोजित डेझर्ट नाइट या युद्ध सरावात सहभाग घेतला. यात भारतासोबतच  फ्रेंच हवाई दल आणि  युक्त अरब अमिराती (UAE) हवाई दलानेही सहभाग घेतला.  (ANI)

भारतीय हवाई दलातील सुखोई ३०, मिग २९, आणि जग्वार लढाऊ विमाने, तसेच AWACS (हवेतून पूर्व चेतावणी आणि नियंत्रण विमान), एक C-130-J वाहतूक विमान, आणि हवेतून हवेत इंधन भरणारे विमान यांनी सहभाग घेत हवाई कसरती सादर केल्या. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

भारतीय हवाई दलातील सुखोई ३०, मिग २९, आणि जग्वार लढाऊ विमाने, तसेच AWACS (हवेतून पूर्व चेतावणी आणि नियंत्रण विमान), एक C-130-J वाहतूक विमान, आणि हवेतून हवेत इंधन भरणारे विमान यांनी सहभाग घेत हवाई कसरती सादर केल्या. (ANI)

 फ्रान्सकडून राफेल तर यएईकडून एफ १६ जातीची लढाऊ विमाने या सरावात सामील झाली होती. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

 फ्रान्सकडून राफेल तर यएईकडून एफ १६ जातीची लढाऊ विमाने या सरावात सामील झाली होती. (PTI)

डेझर्ट नाइट  या सरावाचा उद्देश हा तिन्ही हवाई दलांमधील समन्वय आणि परस्पर कार्यक्षमता वाढवण्यावर होता. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

डेझर्ट नाइट  या सरावाचा उद्देश हा तिन्ही हवाई दलांमधील समन्वय आणि परस्पर कार्यक्षमता वाढवण्यावर होता. (PTI)

या विमानांचे कार्यान्वयन संयुक्त अरब अमिरातीमधील अल धफ्रा हवाई तळावरून केले जात होते. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सुखोई-30 एमकेआय, मिग-29, जॅग्वार, एडब्ल्यूएसीएस, सी-130-जे आणि हवेतच इंधन भरु शकणाऱ्या एअर टू एअर रिफ्युएलर विमानांचा समावेश होता.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

या विमानांचे कार्यान्वयन संयुक्त अरब अमिरातीमधील अल धफ्रा हवाई तळावरून केले जात होते. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सुखोई-30 एमकेआय, मिग-29, जॅग्वार, एडब्ल्यूएसीएस, सी-130-जे आणि हवेतच इंधन भरु शकणाऱ्या एअर टू एअर रिफ्युएलर विमानांचा समावेश होता.(X/@IAF_MCC)

भारतीय हवाई हद्दीतील सराव अरबी समुद्रावर आयोजित करण्यात आला होता. या सरावात सामील झालेल्या भारतीय हवाई दलाच्या विमानांचे कार्यान्वयन भारतातील तळांवरून करण्यात आले. तिन्ही हवाई दलांदरम्यान समन्वय वाढवण्यासाठी 'डेझर्ट नाईट' या सरावाचे आयोजन करण्यात आले होते. सरावादरम्यान ज्ञान, अनुभवांची देवाणघेवाण झाली.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

भारतीय हवाई हद्दीतील सराव अरबी समुद्रावर आयोजित करण्यात आला होता. या सरावात सामील झालेल्या भारतीय हवाई दलाच्या विमानांचे कार्यान्वयन भारतातील तळांवरून करण्यात आले. तिन्ही हवाई दलांदरम्यान समन्वय वाढवण्यासाठी 'डेझर्ट नाईट' या सरावाचे आयोजन करण्यात आले होते. सरावादरम्यान ज्ञान, अनुभवांची देवाणघेवाण झाली.(X/@IAF_MCC)

WhatsApp channel

इतर गॅलरीज