
अशीया खंडातील दुसरे मोठे चर्च असलेले छत्तीसगडच्या अवर लेडी ऑफ द रोझरी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी नागरिक एकत्र जमले होते. जशपूर येथे असलेल्या या चर्चमध्ये अंदाजे १० हजारहून अधिक नागरिक प्रार्थना करू शकतात. देशातील सर्वोच्च नेत्यांनी शांतता आणि प्रेमाचा संदेश देत ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. अमृतसर येथे एक मुलगा ख्रिसमसनिमित्त पोलीस अधिकार्यांना शुभेच्छा दिल्या. या सोबतच त्याने काही खाद्यपदार्थ देखील त्यांच्या सोबत शेअर केले.
रविवारी चंदीगडमधील चर्चमध्ये मुलांची एकत्र येत मेणबत्त्या पेटवत प्रभू येशू समोर प्रार्थना केली.
लोक चंदीगडमधील चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमतात. या दिवशी आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात येत असते.
रांची येथील रोमन कॅथोलिक चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना आयोजित केली जात असून या ठिकाणी प्रार्थनेसाठी जमलेले नागरिक.


