जगातील अनेक देशांचे संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतात. त्यापैकी तीन देशांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७०० किंवा त्याहून अधिक सामने गमावले आहेत. आता यामध्ये टीम इंडियाच्या नावाचाही समावेश झाला आहे. राजकोट टी-२० सामन्यातील पराभव हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील टीम इंडियाचा ७०० वा पराभव ठरला आहे. भारताच्या आधी दोन देशांनी ही नकोशी कामगिरी केली आहे.
(BCCI X)हरण्यात इंग्लंड नंबर वन
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळलेला आणि सर्वाधिक सामने गमावणारा संघ इंग्लंड आहे. या संघानं आतापर्यंत २०९० सामने खेळले आहेत, त्यापैकी ७७७ आंतरराष्ट्रीय सामन्यांत (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सह) इंग्लंडचा पराभव झाला आहे.
वेस्ट इंडिज दुसऱ्या क्रमांकावर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने गमावणारा वेस्ट इंडिजचा संघ जगातील दुसरा संघ आहे. वेस्ट इंडिजनं आतापर्यंत १६८२ सामन्यांत ७४० सामने गमावले आहेत. एकेकाळी वेस्ट इंडिजनं क्रिकेट जगतावर अक्षरश: राज्य केलं होतं. आग ओकणाऱ्या त्यांच्या गोलंदाजांपुढं जगातील फलंदाजांना टिकणं कठीण होतं. मात्र, मागील अनेक वर्षांपासून वेस्ट इंडिजचा संघ चाचपडतो आहे.
टीम इंडियानं मंगळवारी, २८ जानेवारी रोजी आपला १६८६ वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या सामन्यात पराभव झाल्यामुळं भारतानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७०० वा सामना गमावला. इतके सामने गमावणारा भारत हा तिसरा देश आहे.
(Surjeet Yadav ANI)श्रीलंका चौथ्या क्रमांकावर
श्रीलंकेचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७०० सामने गमावण्याच्या जवळ पोहोचला आहे. श्रीलंकेनं आतापर्यंत खेळलेल्या १४५६ सामन्यांपैकी ६८६ सामने गमावले आहेत. सर्वाधिक सामने गमावण्याच्या बाबतीत श्रीलंका चौथ्या स्थानावर आहे.