मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IND vs SA 2nd Test : भारताने दीड दिवसात कसोटी जिंकली, बुमराह-सिराज विजयाचे हिरो

IND vs SA 2nd Test : भारताने दीड दिवसात कसोटी जिंकली, बुमराह-सिराज विजयाचे हिरो

Jan 04, 2024 07:27 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • India vs South Africa series : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची केपटाऊन कसोटी जिंकली आहे. हा सामना ३ जानेवारीला सुरू झाला आणि ४ जानेवारीला दुसऱ्या सत्रात संपला. कसोटी क्रिकेटचा हा सर्वात लहान सामना ठरला आहे. या विजयासह भारताने कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.

टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी केवळ ७९ धावांचे लक्ष्य होते, हे लक्ष्य भारताने १२2 षटकात ३ गडी गमावून पूर्ण केले. भारताकडून सिराजने पहिल्या डावात ६ तर बुमराहने दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेतल्या. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी केवळ ७९ धावांचे लक्ष्य होते, हे लक्ष्य भारताने १२2 षटकात ३ गडी गमावून पूर्ण केले. भारताकडून सिराजने पहिल्या डावात ६ तर बुमराहने दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेतल्या. (AFP)

दुसऱ्या डावात आफ्रिकेकडून एडन मार्करामने शतक झळकावले. त्याने १०३ चेंडूत १७ चौकार आणि २ षटकारांसह १०६ धावा केल्या, मात्र इतर कोणत्याही फलंदाजाने मार्करामला साथ दिली नाही. आफ्रिकेला दुसऱ्या डावात १७६ धावा करता आल्या. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

दुसऱ्या डावात आफ्रिकेकडून एडन मार्करामने शतक झळकावले. त्याने १०३ चेंडूत १७ चौकार आणि २ षटकारांसह १०६ धावा केल्या, मात्र इतर कोणत्याही फलंदाजाने मार्करामला साथ दिली नाही. आफ्रिकेला दुसऱ्या डावात १७६ धावा करता आल्या. (PTI)

आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आफ्रिका पहिल्या डावात ५५ धावांवर गारद झाली. पहिल्या डावात भारताकडून सिराजने सर्वाधिक ६ विकेट घेतले. तर दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने ६ विकेट घेतल्या.
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आफ्रिका पहिल्या डावात ५५ धावांवर गारद झाली. पहिल्या डावात भारताकडून सिराजने सर्वाधिक ६ विकेट घेतले. तर दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने ६ विकेट घेतल्या.(PTI)

मोहम्मद सिराजला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याच्या धारदार गोलंदाजीमुळेच आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात ५५ धावांवर गारद झाला आणि भारताला मोठी आघाडी मिळवता आली.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

मोहम्मद सिराजला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याच्या धारदार गोलंदाजीमुळेच आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात ५५ धावांवर गारद झाला आणि भारताला मोठी आघाडी मिळवता आली.(AFP)

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू डीन एल्गरचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्याने मालिकेआधीच निवृत्ती जाहीर केली होती. पण एल्गरला शेवटच्या सामन्यात विजय मिळवता आला नाही. तो या सामन्यात कर्णधार होता. एल्गरने पहिल्या कसोटीत सेंच्युरियनमध्ये १८५ धावांची खेळी केली होती. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू डीन एल्गरचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्याने मालिकेआधीच निवृत्ती जाहीर केली होती. पण एल्गरला शेवटच्या सामन्यात विजय मिळवता आला नाही. तो या सामन्यात कर्णधार होता. एल्गरने पहिल्या कसोटीत सेंच्युरियनमध्ये १८५ धावांची खेळी केली होती. (REUTERS)

डीन एल्गरला विराट मैदानात उपस्थित सर्वांनी भावनिक निरोप दिला. एल्गरला शेवटच्या सामन्यात विशेष काही करता आले नाही. तो पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात १२ धावा करून बाद झाला.
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

डीन एल्गरला विराट मैदानात उपस्थित सर्वांनी भावनिक निरोप दिला. एल्गरला शेवटच्या सामन्यात विशेष काही करता आले नाही. तो पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात १२ धावा करून बाद झाला.(AFP)

टीम इंडियाने डीन एल्गरला विराट कोहलीची जर्सी भेट दिली. या जर्सीवर सर्व खेळाडूंच्या स्वाक्षरी होत्या. एल्गर आणि जसप्रीत बुमराह यांना विभागून प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला.
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

टीम इंडियाने डीन एल्गरला विराट कोहलीची जर्सी भेट दिली. या जर्सीवर सर्व खेळाडूंच्या स्वाक्षरी होत्या. एल्गर आणि जसप्रीत बुमराह यांना विभागून प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला.(AFP)

केपटाऊनमध्ये भारतीय संघाचा हा पहिलाच कसोटी विजय ठरला. याआधी केपटाऊनमध्ये झालेल्या ६ कसोटी सामन्यांमध्ये भारताला ४ वेळा पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर २ सामने अनिर्णित राहिले होते.  भारतीय संघ १९९२ पासून दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर द्विपक्षीय कसोटी मालिका खेळत आहे.
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

केपटाऊनमध्ये भारतीय संघाचा हा पहिलाच कसोटी विजय ठरला. याआधी केपटाऊनमध्ये झालेल्या ६ कसोटी सामन्यांमध्ये भारताला ४ वेळा पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर २ सामने अनिर्णित राहिले होते.  भारतीय संघ १९९२ पासून दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर द्विपक्षीय कसोटी मालिका खेळत आहे.(PTI)

WhatsApp channel

इतर गॅलरीज