
एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाल्यापासून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या भवितव्याबद्दल अटकळ सुरू झाली. काही महिन्यांत वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-२० विश्वचषक होणार आहे. त्या स्पर्धेदरम्यान भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज संघात असतील की नाही, अशी भीती चाहत्यांना लागली. दरम्यान, कोहलीने आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतून माघार घेतली.
(PMO )कोहलीने विश्वचषकात खेळलेल्या ११ सामन्यात ७६५ धावा केल्या होत्या. विराट सध्या पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विराट २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, विराटने स्वतः बीसीसीआयकडे पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून माघार घेतली.
(PTI)विराट गेल्या काही महिन्यांपासून टी-२० सामने खेळले नाही. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात माजी कर्णधार भारतीय जर्सीमध्ये दिसणार का? असा प्रश्न चाहत्यांसाठी आहे. विराटच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या निर्णयामुळे या अटकळांना खतपाणी मिळाले आहे.
(PTI)बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, 'विराटने वैयक्तिकरित्या संघ निवडक आणि बीसीसीआय अधिकाऱ्यांना कळवले आहे की, त्याला पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधून काही वेळेसाठी ब्रेक घ्यायचा आहे. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये लक्ष केंद्रीत करायचे आहेत.
(PTI)सध्या विराट कोहली लंडनला सुट्टी घालवण्यासाठी गेला आहे. दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्माही लंडनमध्ये सुट्टीवर आहे. विराटबद्दलच्या अटकळांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मात्र रोहितबाबतच्या अटकळांना अद्याप स्पष्ट उत्तर मिळालेले नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात रोहितच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत खेळण्याबाबत बीसीसीआयला काहीही सांगण्यात आलेले नाही.
(REUTERS)

