टीम इंडियाचे खेळाडू फॉर्मात आहेत. गेल्या सामन्यात भारताने आयर्लंडचा पराभव केला होता. आता टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
टीम इंडिया ओपनिंगमध्ये बदल करू शकते. कोहली रोहितसोबत आयर्लंडविरुद्ध सलामीला आला होती. मात्र पाकिस्तानविरुद्ध बदल दिसून येऊ शकतो.
(BCCI-X)भारतीय संघ फिरकीपटूंवर विश्वास व्यक्त करू शकतो. न्यूयॉर्कची खेळपट्टी पाहता अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांची जागा जवळपास निश्चित आहे. हे दोन्ही खेळाडू फलंदाजीसोबतच गोलंदाजीमध्येही निष्णात आहेत. जडेजा आणि अक्षर यांचा आतापर्यंतचा रेकॉर्ड चांगला आहे.
(AP)पाकिस्तानी खेळाडूंचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. अमेरिकेविरुद्ध पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा बाबर आझमच्या संघासाठी डोकेदुखी ठरू शकतात.
(Getty Images via AFP)मोहम्मद रिझवान आणि उस्मान खान यांच्यासह फखर जमानला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. मोहम्मद आमिर आणि हरिस रौफ यांनाही भारताविरुद्ध मैदानात उतरण्याची संधी मिळू शकते.
(AFP)भारत आणि पाकिस्तान संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.
पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), उस्मान खान, फखर जमान, आझम खान, इफ्तिखार अहमद, शादाब खान/सायम अयुब, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अमीर, हरिस रौफ.
(BCCI-X)