सर्वाधिक ७ वेळा आशिया चषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. यावेळी भारताला पाकिस्तानशी अत्यंत सावधगिरीने सुरुवात करावी लागणार आहे. विशेषत: तीन खेळाडूंपासून भारताला सर्वाधिक धोका आहे.
या खेळाडूंमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल स्थानावर आहे. बाबर सध्या वनडे आणि टी-२० रॅंकिंगमध्ये नंबर वन वर आहे. तसेच, तो सध्या त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम फॉर्मध्ये आहे.
बाबरशिवाय यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी हेही भारतासाठी धोकादयक ठरु शकतात.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडला यांना या तिघांच्या विरोधात विषेष तयारी करावी लागणार आहे. तसेच मजबूत रणनीतीही बनवावी लागणार आहे.
भारत आणि पाकिस्तान गेल्या वेळी T20 वर्ल्ड कपमध्ये आमनेसामने आले होते. त्या सामन्यात टीम इंडियाचा १० विकेट्सनी पराभव झाला होता. त्या सामन्यात शाहीनने भारतीय संघाचा धुव्वा उडवला होता. आता त्याच गोलंदाजाविरुद्ध टीम इंडियाला सर्वाधिक तयारी करावी लागणार आहे.
त्या सामन्यात शाहीनने टॉप-३ फलंदाज रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहलीला आपला बकरा बनवले होते. भारताने केवळ ६ धावांत दोन विकेट गमावल्या होत्या. तसेच याच सामन्यात बाबरने ६८ आणि रिझवानने नाबाद ७९ धावा करत संघाला विजय मिळवून दिला होता.
बाबर आझम टी-20 जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. जर आपण गेल्या दोन वर्षांबद्दल चर्चा केली तर या कालावधीत सर्वाधिक १२१५ धावा करणारा बाबर आझम हा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने ४०.५० च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. तसेच एक शतकही केले आहे.
त्याच वेळी, मोहम्मद रिझवान हा गेल्या दोन वर्षांत वर्ल्ड टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक १४७७ धावा करणारा खेळाडू आहे. यादरम्यान त्याची सरासरी ६७.१३ होती. रिझवाननेही एक शतक आणि १३ अर्धशतके झळकावली आहेत. सध्या रिझवान हा जागतिक टी-२० क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.