न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका ही या खेळाडूंसाठी शेवटची संधी ठरू शकते. या मालिकेत भारताला अजून २ सामने खेळायचे आहेत. या सामन्यांमध्ये या खेळाडूंना मोठी कामगिरी करून दाखवावी लागेल. नाही तर टी-20 फॉरमॅटचे दरवाजे या खेळाडूंसाठी बंद होऊ शकतात.
Ishan Kishan - इशान किशनचे नाव या यादीत पहिल्या क्रमांकावर येते कारण तो टी-२० फॉरमॅटचा मास्टर मानला जातो. इंडियन प्रीमियर लीग आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मोठी खेळी खेळणारा इशान येथे धावा काढण्यासाठी धडपडत आहे. गेल्या १२ डावांत त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. तर गेल्या ५ डावात त्याला १० धावांच्या जवळपासही पोहोचता आलेले नाही.
Shubman Gill - शुभमन गिलने वनडेमध्ये अप्रतिम कामगिरी केली. आहे. मात्र टी-20 मध्ये तो सतत फ्लॉप ठरत आहे. आतापर्यंत झालेल्या ४ सामन्यांपैकी फक्त एकदाच त्याने दोन अंकी आकडा गाठला आहे. ३ सामन्यांत, तो एकाही डावात १० धावांपर्यंत पोहोचू शकला नाही.
Rahul Tripathi- राहुल त्रिपाठी हा देखील आपल्या वाट्याला येणारी प्रत्येक संधी वाया घालवत आहे. टी-20 संघात विराट कोहलीची वन डाऊनची जागा राहुलला देण्यात आली आहे. गेल्या ३ पैकी दोन सामन्यात त्याला केवळ ५ धावा करता आल्या आहेत. तर एका सामन्यात त्याने ३५ धावांची इनिंग खेळली होती.