(2 / 6)Shreyas Iyer- एकेकाळी कर्णधारपदाचा दावेदार असलेल्या श्रेयस अय्यरला खराब फॉर्ममुळे टी-२० संघातून वगळण्यात आले. मात्र, वनडेमध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळेच त्याला आता वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. आता या संधीचा तो कसा फायदा घेतो हे पाहावे लागेल. ऑक्टोबर २०२२ मध्ये तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा टी-२० खेळला होता. श्रेयस अय्यरने गेल्या १२ टी-२० डावांमध्ये केवळ दोन अर्धशतके झळकावली आहेत.(Shreyas Iyer- instagram)