दुसरी कसोटी रोमहर्षक स्थितीत, बॅझबॉल आणि भारतीय फिरकीपटू यांच्यात रंगणार चुरशीचा सामना
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  दुसरी कसोटी रोमहर्षक स्थितीत, बॅझबॉल आणि भारतीय फिरकीपटू यांच्यात रंगणार चुरशीचा सामना

दुसरी कसोटी रोमहर्षक स्थितीत, बॅझबॉल आणि भारतीय फिरकीपटू यांच्यात रंगणार चुरशीचा सामना

दुसरी कसोटी रोमहर्षक स्थितीत, बॅझबॉल आणि भारतीय फिरकीपटू यांच्यात रंगणार चुरशीचा सामना

Feb 04, 2024 07:55 PM IST
  • twitter
  • twitter
  • भारत आणि इंग्लंड यांच्यातील विशाखापट्टणम येथे सुरू असलेला दुसरा कसोटी सामना रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. तिसऱ्या दिवशी (फेब्रुवारी) टीम इंडियाने इंग्लंडला ३९९ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडने दिवसाचा खेळ संपेपर्यंत केवळ १४ षटकात एक बाद ६७ धावा केल्या.
यानंतर आता टीम इंडिया विजयासाठी ९ विकेट्स काढायच्या आहेत तर इंग्लंडला ३३२ धावा करायच्या आहेत. मात्र, इंग्लंडसाठी ३९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे असणार नाही, कारण भारतीय पीचेसवर कोणत्याही संघाने आतापर्यंत इतके मोठे लक्ष्य गाठले नाही.
twitterfacebook
share
(1 / 5)
यानंतर आता टीम इंडिया विजयासाठी ९ विकेट्स काढायच्या आहेत तर इंग्लंडला ३३२ धावा करायच्या आहेत. मात्र, इंग्लंडसाठी ३९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे असणार नाही, कारण भारतीय पीचेसवर कोणत्याही संघाने आतापर्यंत इतके मोठे लक्ष्य गाठले नाही.(BCCI-X)
पण चौथ्या दिवशीही इंग्लंड त्यांच्या बॅझबॉल शैलीत आक्रमक क्रिकेट खेळू शकतो. तअशा स्थितीत भारतीय फिरकीपटू आणि बॅझबॉल क्रिकेट यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळेल.  
twitterfacebook
share
(2 / 5)
पण चौथ्या दिवशीही इंग्लंड त्यांच्या बॅझबॉल शैलीत आक्रमक क्रिकेट खेळू शकतो. तअशा स्थितीत भारतीय फिरकीपटू आणि बॅझबॉल क्रिकेट यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळेल.  (BCCI-X)
टीम इंडियाने २००८ मध्ये इतिहास रचला- भारतीय भूमीवर सर्वात मोठे लक्ष्य टीम इंडियाने गाठले होते. भारताने २००८ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३८७ धावांचे लक्ष्य गाठले होते. अशा स्थितीत इंग्लिश संघ दुसऱ्या डावात काय कामगिरी करतो हे पाहणे बाकी आहे. 
twitterfacebook
share
(3 / 5)
टीम इंडियाने २००८ मध्ये इतिहास रचला- भारतीय भूमीवर सर्वात मोठे लक्ष्य टीम इंडियाने गाठले होते. भारताने २००८ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३८७ धावांचे लक्ष्य गाठले होते. अशा स्थितीत इंग्लिश संघ दुसऱ्या डावात काय कामगिरी करतो हे पाहणे बाकी आहे. (ANI )
भारताचा दुसरा डाव २५५ धावांवर आटोपला- पहिल्या डावात १४३ धावांची आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियाला दुसऱ्या डावात केवळ २५५ धावा करता आल्या. शुभमन गिलने भारताकडून दुसऱ्या डावात १०४ धावांची शानदार शतकी खेळी केली. गिलने आपल्या खेळीत ११ चौकार आणि २ षटकार मारले. गिलचे कसोटी क्रिकेटमधील हे तिसरे शतक आहे.
twitterfacebook
share
(4 / 5)
भारताचा दुसरा डाव २५५ धावांवर आटोपला- पहिल्या डावात १४३ धावांची आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियाला दुसऱ्या डावात केवळ २५५ धावा करता आल्या. शुभमन गिलने भारताकडून दुसऱ्या डावात १०४ धावांची शानदार शतकी खेळी केली. गिलने आपल्या खेळीत ११ चौकार आणि २ षटकार मारले. गिलचे कसोटी क्रिकेटमधील हे तिसरे शतक आहे.(ANI )
पहिल्या डावात जैस्वालचे द्विशतक- याआधी यशस्वी जैस्वालने पहिल्या डावात द्विशतक (२०९) झळकावले होते. तर इंग्लंडने पहिल्या डावात २५३ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला १४३ धावांची आघाडी मिळाली होती.
twitterfacebook
share
(5 / 5)
पहिल्या डावात जैस्वालचे द्विशतक- याआधी यशस्वी जैस्वालने पहिल्या डावात द्विशतक (२०९) झळकावले होते. तर इंग्लंडने पहिल्या डावात २५३ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला १४३ धावांची आघाडी मिळाली होती.(PTI)
इतर गॅलरीज