(5 / 4)रविंद्र जडेजा १५५ चेंडूंत ८१ धावांवर नाबाद आहे, तर अक्षर ६२ चेंडूंत ३५ धावांवर नाबाद आहे. तत्पूर्वी, या सामन्यात इंग्लंडने पहिल्या दिवशी सर्वबाद २४६ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक ७० धावा केल्या. तर भारताकडून अश्विन आणि जडेजा या दोघांनी प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या. तर अक्षर आणि बुमराह यांना प्रत्येकी दोन विकेट मिळाले.(ANI )