मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  दमदार शतकासह जो रूटने पाँटिंगचा विक्रम मोडला; सर्वात जलद १९ हजार धावा करणारा इंग्लंडचा खेळाडू ठरला

दमदार शतकासह जो रूटने पाँटिंगचा विक्रम मोडला; सर्वात जलद १९ हजार धावा करणारा इंग्लंडचा खेळाडू ठरला

Feb 23, 2024 10:54 PM IST Ashwjeet Rajendra Jagtap
  • twitter
  • twitter

  • Joe Root Breaks Ricky Ponting Record: भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत शतक झळकावणाऱ्या जो रूटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला.

रांची येथे सुरु असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात जो रूटने दमदार शतक झळकावले. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील ३१ वे शतक आहे. या कामगिरीसह त्याने खास विक्रमाला गवसणी घातली.
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

रांची येथे सुरु असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात जो रूटने दमदार शतक झळकावले. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील ३१ वे शतक आहे. या कामगिरीसह त्याने खास विक्रमाला गवसणी घातली.

२१९ चेंडूत १०० धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या रूटने दुसऱ्या दिवशीही चांगली फलंदाजी केली. त्याने संथ डावात २२६ चेंडूत १०६ धावा केल्या. ज्यात ९ चौकारांचा समावेश आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

२१९ चेंडूत १०० धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या रूटने दुसऱ्या दिवशीही चांगली फलंदाजी केली. त्याने संथ डावात २२६ चेंडूत १०६ धावा केल्या. ज्यात ९ चौकारांचा समावेश आहे.

या शतकासह त्याने भारताविरुद्ध १० कसोटी शतके झळकावणारा जगातील पहिला फलंदाज म्हणून इतिहास रचला. या कामगिरीसह त्याने स्टीव्ह स्मिथचा विक्रम मोडला. त्याने ५२ डावात दहावे शतक झळकावले.
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

या शतकासह त्याने भारताविरुद्ध १० कसोटी शतके झळकावणारा जगातील पहिला फलंदाज म्हणून इतिहास रचला. या कामगिरीसह त्याने स्टीव्ह स्मिथचा विक्रम मोडला. त्याने ५२ डावात दहावे शतक झळकावले.

स्टीव्ह स्मिथने भारताविरुद्ध ३७ डावात ९ शतके झळकावली होती.  गॅरी सोबर्सने भारताविरुद्ध ३० डावांत ८ शतके ठोकली आहेत, तर विवियन रिचर्ड्स आणि रिकी पाँटिंग यांनी अनुक्रमे ४१ आणि ५१ डावांत प्रत्येकी ८-८ शतके झळकावली आहेत.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

जो रूट सर्वात जलद १९ हजार आंतरराष्ट्रीय धावांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडच्या स्टार फलंदाजाने ४४४ डावात १९ हजार धावा पूर्ण केल्या. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

जो रूट सर्वात जलद १९ हजार आंतरराष्ट्रीय धावांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडच्या स्टार फलंदाजाने ४४४ डावात १९ हजार धावा पूर्ण केल्या. 

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने ३९९ डावात १९ हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा गाठला. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आहे, ज्याने ४३२ डावांत १९ हजार धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या स्थानावर असलेल्या लाराने ४३३ डावांत ही कामगिरी केली.
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

जो रूटने रिकी पाँटिंगला (२ हजार ५५५ धावा) मागे टाकत भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने भारताविरुद्ध २९ कसोटी सामन्यांमध्ये ५६ पेक्षा जास्त सरासरीने २ हजार ६०० हून अधिक धावा केल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

जो रूटने रिकी पाँटिंगला (२ हजार ५५५ धावा) मागे टाकत भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने भारताविरुद्ध २९ कसोटी सामन्यांमध्ये ५६ पेक्षा जास्त सरासरीने २ हजार ६०० हून अधिक धावा केल्या आहेत.(AFP)

जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये ११,५०० धावाही पूर्ण केल्या. रांचीयेथे सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत सात धावांची खेळी केल्यानंतरच त्याने हा टप्पा गाठला. हा टप्पा गाठणारा रूट इंग्लंडचा दुसरा आणि एकूण दहावा फलंदाज ठरला.
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये ११,५०० धावाही पूर्ण केल्या. रांचीयेथे सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत सात धावांची खेळी केल्यानंतरच त्याने हा टप्पा गाठला. हा टप्पा गाठणारा रूट इंग्लंडचा दुसरा आणि एकूण दहावा फलंदाज ठरला.(PTI)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज