मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  यशस्वी जैस्वाल द्विशतकाच्या दिशेने, विशाखापट्टणम कसोटीत पहिल्या दिवशी काय-काय घडलं? पाहा

यशस्वी जैस्वाल द्विशतकाच्या दिशेने, विशाखापट्टणम कसोटीत पहिल्या दिवशी काय-काय घडलं? पाहा

Feb 02, 2024 09:09 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • India vs England 2nd Test, Day 1 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून (२ फेब्रुवारी) विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पहिल्या डावात ६ गडी गमावून ३३६ धावा केल्या होत्या.

भारत-इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पहिल्या डावात ६ गडी गमावून ३३६ धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वाल १७९ धावा करून तर रविचंद्रन अश्विन ५ धावांवर नाबाद परतले आहेत, उद्या (३ फेब्रुवारी) दोघेही या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात करतील.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

भारत-इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पहिल्या डावात ६ गडी गमावून ३३६ धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वाल १७९ धावा करून तर रविचंद्रन अश्विन ५ धावांवर नाबाद परतले आहेत, उद्या (३ फेब्रुवारी) दोघेही या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात करतील.(Reuters)

भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर रोहित आणि यशस्वी यांनी पहिल्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. कर्णधार रोहित मोठी खेळी खेळेल असे वाटत होते, पण तो नवोदित फिरकी गोलंदाज शोएब बशीरच्या जाळ्यात अडकला. रोहित १४ धावा करून बाद झाला.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर रोहित आणि यशस्वी यांनी पहिल्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. कर्णधार रोहित मोठी खेळी खेळेल असे वाटत होते, पण तो नवोदित फिरकी गोलंदाज शोएब बशीरच्या जाळ्यात अडकला. रोहित १४ धावा करून बाद झाला.(ANI)

या सामन्याचा पहिला दिवस संपूर्णपणे यशस्वी जैस्वालच्या नावावर राहिला. एकीकडे सातत्यने विकेट जात असताना दुसऱ्या टोकाला यशस्वी क्रीजवर राहिला आणि त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा धाडसाने सामना केला.  यशस्वीने आज २५७ चेंडूंचा सामना करताना १७९ धावा केल्या. यात त्याने १७ चौकार आणि ५ ठोकले.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

या सामन्याचा पहिला दिवस संपूर्णपणे यशस्वी जैस्वालच्या नावावर राहिला. एकीकडे सातत्यने विकेट जात असताना दुसऱ्या टोकाला यशस्वी क्रीजवर राहिला आणि त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा धाडसाने सामना केला.  यशस्वीने आज २५७ चेंडूंचा सामना करताना १७९ धावा केल्या. यात त्याने १७ चौकार आणि ५ ठोकले.(Reuters)

यशस्वी जैस्वालने आज आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. पण भारताचे इतर फलंदाज मात्र, इंग्लिश गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसले. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

यशस्वी जैस्वालने आज आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. पण भारताचे इतर फलंदाज मात्र, इंग्लिश गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसले. (ANI)

भारत-इंग्लंड कसोटीत आज दिवसभरात ९० पेक्षा जास्त षटकांचा खेळ झाला. यात भारताने ३ बाद ३३६ धावा ठोकल्या. भारताकडून केवळ यशस्वी जैस्वालनेच ५० हून अधिका धावा केल्या.  
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

भारत-इंग्लंड कसोटीत आज दिवसभरात ९० पेक्षा जास्त षटकांचा खेळ झाला. यात भारताने ३ बाद ३३६ धावा ठोकल्या. भारताकडून केवळ यशस्वी जैस्वालनेच ५० हून अधिका धावा केल्या.  (ANI)

भारतीय फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, मात्र ते मोठी खेळी खेळू शकले नाहीत. जैस्वालनंतर शुभमन गिलने ३४ धावा केल्या, ही भारताकडून दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

भारतीय फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, मात्र ते मोठी खेळी खेळू शकले नाहीत. जैस्वालनंतर शुभमन गिलने ३४ धावा केल्या, ही भारताकडून दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.(Reuters)

WhatsApp channel

इतर गॅलरीज