भारत-इंग्लंड ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव केला. यासह भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या विजयाचा हिरो जसप्रीत बुमराह ठरला. त्याने सामन्यात ९ विकेट घेतल्या. यानंतर पाकिस्तानचा वकार युनूस बुमराहचा फॅन झाला आहे.
(REUTERS)वकार युनूसने बुमराहच्या गोलंदाजीचे कौतुक केले आहे. विशेषतः वकार बुमराहच्या यॉर्कर्सने खूप प्रभावित झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहने यॉर्करचा सुरेख वापर केला. बुमराहच्या एका यॉर्करवर तर ऑली पोपचा मिडल आणि लेग स्टंप हवेत उडाला.
(REUTERS)बुमराहने ऑली पोपला टाकेला तो यॉर्कर पाहून चाहते वेडे झाले होते आणि दिवसभर सोशल मीडियावर त्याच्या या बॉलची चर्चा होत होती.
(AFP)यानंतर वकार युनूसला बुमराहच्या यॉर्करबाबत विचारण्यात आले की, बुमराहने पोपकडे टाकलेला यॉर्करला तुम्हाला कोणाची तरी आठवण करून देतो का? यावर वकारने उत्तर दिले, 'मला कोणाचीच आठवण येत नाही. ही फक्त बुमराहची जादू आहे.
(PTI)बुमराह त्याच्या वेगवान आणि अचूक यॉर्कर्सने जगभरातील फलंदाजांसाठी एक भीती बनला आहे. त्याचा यॉर्कर इतका अचूक आहे की फलंदाजाला अजिबात सावरण्याची संधी मिळत नाही. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून बुमराह टीम इंडियाचा मॅचविनर आहे.
(ANI )या सामन्यात भारताने प्रथम फलंदजी केली आणि सर्वबाद ३९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २५३ धावात गारद झाला आणि भारताला १५३ धावांची आघाडी मिळाली. यानंतर भारताचा दुसरा डाव २५५ धावांवर आटोपला आणि पहिल्या डावाच्या आधारे इंग्लंडला ३९९ धावांचे लक्ष्य मिळाले. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड दुसऱ्या डावात २९२ धावांवर सर्वबाद झाला.
(AFP)