
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील फायनल सामन्यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने विराट कोहलीला खास गिफ्ट दिले आहे.
सचिन तेंडुलकरने २०११च्या विश्वचषकादरम्यान घातलेली जर्सी विराट कोहलीला भेट दिली. सचिन तेंडुलकरकडून मिळालेले गिफ्ट पाहून विराट कोहलीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसले.
सचिन तेंडुलकरने कोहलीला त्याच्या जर्सीसह एक पत्र पाठवले. या पत्रात सचिन तेंडुलकरने विराट तू आमचा अभिमान वाढवला आहेस, असे लिहिले आहे.

