आजच्या काळात बहुतेक पालकांना आपल्या मुलाच्या उंचीची काळजी असते. कारण वय वाढत आहे पण मुलाची उंची मात्र वाढत नाही.
(pexel)प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि खनिजे यांसारख्या पोषक घटकांची मुलाची उंची वाढवण्यात महत्त्वाची भूमिका असते.
तुमच्यासुद्धा मुलाची उंची वाढत नसेल तर, चला जाणून घेऊया अशा काही ज्यूसबद्दल, जे पिल्याने तुमच्या मुलांची उंची वाढेल.
(pexel)पेरूचे ज्यूस - जर तुम्हाला तुमच्या मुलाची उंची वाढवायची असेल, तर त्याला पेरूचा रस प्यायला द्या. कारण पेरूच्या रसामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, फायबर, व्हिटॅमिन सी इत्यादी पोषक घटक असतात जे मुलांच्या आरोग्यासाठी आणि उंची वाढवण्यासाठी सर्वात फायदेशीर असतात. पेरूचा रस प्यायल्याने पचनाच्या समस्या मुळापासून दूर होतात आणि मुलांची उंची वाढवण्यातही ते खूप प्रभावी ठरू शकते.
(pexel)स्ट्रॉबेरी ज्यूस-
स्ट्रॉबेरीचा रस मुलांसाठी सर्वात फायदेशीर आहे. कारण स्ट्रॉबेरीमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, लोह, कॅल्शियम इत्यादी अनेक पोषक घटक असतात. जे मुलांच्या हाडांच्या विकासात मदत करतात आणि मुलांची उंची वाढवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात.