Makar Sankranti celebrations across India : आज मकरसंक्रांत सण आहे. हा सण देशभरात विविध भागात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. संक्रांती, लोहरी, पोंगल, माघ बिहू आणि उत्तरायण या वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा हा राष्ट्रव्यापी सण आहे.
(1 / 10)
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी ओडिशाच्या तालचेर येथे मकर संक्रांती उत्सवादरम्यान माँ हिंगुला मंदिरात प्रार्थना केली.(X/Dharmendra Pradhan)
(2 / 10)
पाटणा येथील एनआयटी घाट येथे गंगा नदीकाठावरील महिलांनी विविध धार्मिक विधी पार पाडत रविवारी मकर संक्रांत साजरी केली. (Santosh Kumar/Hindustan Times)
(3 / 10)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी गायींना चारा देऊन मकर संक्रांती साजरी केली.(X/Narendra Modi)
(4 / 10)
पंतप्रधान मोदी रविवारी नवी दिल्लीतील केंद्रीय मंत्री एल मुरुगन यांच्या निवासस्थानी विधी करत पोंगल सणाच्या उत्सवात सहभागी झाले होते.(X/Narendra Modi)
(5 / 10)
भोगी, तीन दिवसीय मकर संक्रांती उत्सवाच्या उद्घाटनाच्या दिवशी रविवारी हैदराबादमध्ये उत्साही वातावरण पहायला मिळाले. (PTI)
(6 / 10)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी अहमदाबादमध्ये मकर संक्रांतीच्या उत्सवादरम्यान पतंग उडवण्याचा आनंद लुटला. (PTI)
(7 / 10)
हैदराबादमधील शिल्परामम येथे रविवारी मकर संक्रांतीच्या उत्सवादरम्यान सजवलेल्या बैलाची मिरवणूक काढण्यात आली.
(8 / 10)
रविवारी पंजाबच्या अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात माघी सण किंवा मकर संक्रांतीच्या वेळी भाविकांनी पूजा केली.
(9 / 10)
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे रविवारी वार्षिक 'माघ मेळा' येथे मकर संक्रांतीच्या वेळी भाविकांनी गंगा नदीत पवित्र स्नान केले.
(10 / 10)
भोपाळ येथील मोतीलाल नेहरू पोलिस स्टेडियममध्ये रविवारी मकर संक्रांतीनिमित्त आयोजित भोपाळ पतंग महोत्सवात ढोल वाजवतांना कलाकार.