भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये खेळला जात आहे. या सामन्यात दोन दिवसांचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवशी (२४ फेब्रुवारी) खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने पहिल्या डावात ७ गडी गमावून २१९ धावा केल्या होत्या.
(PTI)ध्रुव जुरेल ३० आणि कुलदीप यादव १७ धावांवर नाबाद परतले आहेत. पहिल्या डावाच्या आधारे भारत अजूनही इंग्लंडपेक्षा १३४ धावांनी मागे आहे. इंग्लंडने पहिल्या डावात ३५३ धावा केल्या होत्या.
(REUTERS)इंग्लंडच्या ३५३ धावांना प्रत्युत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा २ धावा करून जेम्स अँडरसनच्या चेंडूवर बेन फॉक्सकरवी झेलबाद झाला. यानंतर शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली.
(PTI)गिल सेटल झाला होता आणि तो मोठी इनिंग खेळेल असे वाटत होते, पण शोएबला बशीरचा एक चेंडू त्याला समजला नाही आणि तो एलबीडब्ल्यू आऊट झाला. यानंतर बशीरने रजत पाटीदार आणि रवींद्र जडेजा यांनाही स्वस्तात बाद केले.
(AFP)त्यानंतर शतकाच्या जवळ असलेल्या यशस्वी जैस्वाललाही बशीरने बाद केले. जैस्वालने ११७ चेंडूंचा सामना करताना ८ चौकार आणि १ षटकारासह ७३ धावा केल्या. यशस्वीनंतर सर्फराज खान आणि रविचंद्रन अश्विनही लवकर बाद झाले.
(REUTERS)सरफराज आणि अश्विनला टॉम हार्टलेने बाद केले. १७७ धावांवर सातवी विकेट पडल्यानंतर ध्रुव जुरेल आणि कुलदीप यादव यांनी ४२ धावांची भागीदारी करत डाव सावरला. इंग्लंडकडून आज फिरकी गोलंदाज शोएब बशीर आणि टॉम हार्टले यांनी मिळून ६ विकेट घेतल्या.
(ANI )तत्पूर्वी, टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा संघ पहिल्या डावात ३५३ धावांत सर्वबाद झाला. इंग्लंडकडून जो रूट १२२ धावांवर नाबाद राहिला. तर ऑली रॉबिन्सनने ५८ आणि बेन फॉक्सने ४७ धावा केल्या.
(PTI)