Rahul Gandhi: राहुल गांधींचा नवा अवतार! स्पोर्ट्स बाईकवरून लडाखची भटकंती; फोटो व्हायरल
Rahul Gandhi adopts new biker avatar : काँग्रेस नेते राहुल गांधी स्पोर्ट्स बाईकवरून लडाख भ्रमंती केली. त्यांनी पॅंगॉन्ग सरोवरावर जात येथील निसर्गाचा आनंद लुटला. या ठिकाणी ते त्यांचेवडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा वाढदिवस साजरा करणार आहेत.
(1 / 7)
गांधी आधी लडाखला दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांचा दौरा हा २५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.(Instagram/RahulGandhi)
(2 / 7)
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पोर्ट्स बाइकवर लडाख भ्रमंती केली. यावेळी त्यांनी केलेला स्टायलिश लुक चांगलाच व्हायरल होतो आहे. (Instagram/RahulGandhi)
(3 / 7)
राहुल गांधी यांनी स्टायलिश स्पोर्ट्स बाईक चालवताना निळ्या रंगाच्या बाइकर जॅकेट घातला होता. त्यांच्या या लडाख दौऱ्याचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत. (Instagram/RahulGandhi)
(4 / 7)
राहुल गांधी स्पोर्ट्स बाईकने पॅंगॉन्ग लेकवर देखील गेले. राहुल गांधी ते म्हणाले की, त्यांचे वडील माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणायचे की पॅंगॉन्ग हे जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे.(Instagram/RahulGandhi)
(5 / 7)
राहुल गांधी यांचा जम्मू राज्यानंतर लडाख या केंद्रशासित प्रदेशाचा हा पहिला दौरा आहे. (Instagram/RahulGandhi)
(6 / 7)
गांधींनी यापूर्वी शुक्रवारी लेहमध्ये एका कार्यक्रमादरम्यान तरुणांशी संवाद साधला होता.(Instagram/RahulGandhi)
इतर गॅलरीज