
मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही भागात पाणी साचले आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने मान्सून चे रविवारी शहरात आगमन झाले, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली.
(ANI)नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याचे मुंबईत आगमन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारी वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
(PTI)

