Mercedes Benz new modal: आटोमोबाईल कंपण्यातील आघाडीची असलेल्या मर्सिडीज बेंझ या वर्षात ३ नवीन ईव्हीसह नऊ नवीन कार भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये या महिन्यात जागतिक बाजारात लॉन्च करण्यात आलेल्या EQS फेसलिफ्ट ही देखील भारतीय बाजारात लॉंच केली जाणार आहे.
(1 / 6)
ऑटोमोबाइल क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या जर्मनीच्या मर्सिडीज बेंझने जागतिक बाजारपेठेत नवी इलेक्ट्रिक सेडान EQS ची फेसलिफ्ट हे नवे मॉडल लॉंच केले आहे. जगातील सर्वोत्कृष्ट लक्झरी इलेक्ट्रिक कार म्हणून गणली जाणारी 2025 EQS, २५ एप्रिलपासून निवडक बाजारपेठांमध्ये बुकिंगसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. इलेक्ट्रिक सेडानची फेसलिफ्ट मॉडलचे डिझाईन आणि गाडीतीन नवे फीचर, नव्या यंत्रणा आणि बॅटरीसह ग्राहकांना आकर्षित करत आहेत.
(2 / 6)
मर्सिडीज बेंझने भारतात आधीच EQS इलेक्ट्रिक सेडानची आउटगोइंग आवृत्ती आणली आहे. आता मर्सिडीज बेंझ लवकरच देशात नवीन EQSने नवे मॉडल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मर्सिडीजन या वर्षी भारतीय बाजारात नऊ नवीन मॉडेल्स आणण्याच्या तयारीत आहेत. ज्यामध्ये तीन इलेक्ट्रिक वाहनांचा देखील समावेश राहणार आहे. EQS व्यतिरिक्त, मर्सिडीज EQS Maybach हे मॉडल देखील लाँच करू शकते.
(3 / 6)
मर्सिडीज EQS अनेक डिझाइन आणि आधुनिक फीचरने सुसज्ज आहे. या इलेक्ट्रिक सेडानच्या पुढच्या भागात करण्यात आलेले नवे बदल ठळकपणे दिसून येतात. EQS फेसलिफ्टला ब्लॅक-ग्रिल आणि क्रोम इन्सर्टसह पारंपारिक मर्सिडीजचा लुक या मॉडलमध्ये देखील मिळतो. या कारचा आयकॉनिक लोगो, जो आधी बंद लोखंडी जाळीवर दिसत होता, आता कारमेकरच्या जुन्या मॉडेल्सप्रमाणे बॉनेटवर पुन्हा लावला जाणार आहे.
(4 / 6)
कारच्या केबिनच्या आत, मर्सिडीजने विशाल ५६ इंचाची MBUX प्रणाली देखील दिली आहे. यात स्क्रीन, जी ड्रायव्हर डिस्प्ले, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि पॅसेंजर डिस्प्ले सारख्या आधुनिक यंत्रणा देण्यात आल्या आहेत.
(5 / 6)
EQS फेसलिफ्ट इलेक्ट्रिक सेडान मोठ्या बॅटरी पॅकसह भारतीय बाजारात आणण्यात येणार आहे. मर्सिडीज बेंझने जुनी बॅटरी बदलून नवीन ११८ kWh युनिटची बॅटरी या नव्या मॉडेलमध्ये दिली आहे. ही बॅटरी १० टक्के मोठी आहे. कार निर्मात्याने सांगितले की ते एका चार्जवर सुमारे ६९९ किलोमीटरची माइलेज देऊ शकते. काही व्हेरियंटमध्ये एका चार्जवर रेंज ८२२ किमीपर्यंत जाऊ शकते.
(6 / 6)
मर्सिडीज बेंझने 2025 EQS मध्ये मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी मोकळी जागा आणि लक्झरी सुविधा दिल्या आहेत. यात एक्झिक्युटिव्ह सीटसह पर्यायी रीअर कम्फर्ट पॅकेज प्लस सुविधा देखील देण्यात आली आहे. या गाडीच्या उजव्या बाजूला विशेष फूटरेस्ट देखील देण्यात आले आहे. तर पुढच्या सीटच्या रेलच्या दरम्यान ते देण्यात आले आहे. मागे बसणाऱ्या प्रवाशांना आराम मिळतो. सीट हीटिंग प्लस आणि मागील बाजूस मान आणि खांदा यांना मसाज देणारी यंत्रणा देखील या गाडीचे वैशिष्ट्ये आहे.