क्लासिक लीजेंड्सनं नुकतंच जावा ४२ एफजेचं नवं मॉडेल बाजारात आणलं आहे. नवीन जावा ४२ एफजे ३५० स्टाइलिस्ट आहे. तिचं इंजिन मोठं आणि त्याची क्षमता अधिक आहे. नव्या बाईकची (एक्स-शोरूम) किंमत १.९९ लाख रुपयांपासून आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून डिलिव्हरी सुरू होईल.
ही बाईक लाइनअप स्टाइलिंग आणि यांत्रिक वैशिष्ट्यांच्या वेगळ्या प्रकारची आहे. मात्र, त्यातही वेगळेपण आहे. जावा ४२ स्टँडर्ड प्रमाणेच या मोटारसायकलमध्ये ३३४ सीसी इंजिन आहे. मात्र या बाईकचं इंजिन अधिक अपग्रेडेड आहे.
(Jawa Motorcycles)नवीन जावा ४२ एफजेमध्ये जावा ३५० चे अद्ययावत ३३४ सीसी इंजिन आहे. ही सिंगल सिलिंडर लिक्विड-कूल्ड मोटरबाईक ६-स्पीड गिअरबॉक्सद्वारे २२ बीएचपी पॉवर आणि २८ एनएम टॉर्क जनरेट करते. नवीन बाईक एनव्हीएच लेव्हल, औष्णिक व्यवस्थापन आणि एकंदर परफॉर्मन्सच्या बाबतीत उजवी आहे.
(Jawa Motorcycles)क्लासिक लीजेंड्सनं नवीन जावा ४२ एफजे ३५० मध्ये क्रोम बरोबरच चार मॅट कलर पर्यायांपैकी एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ऑरोरा फॉरेस्ट मॅट, कॉस्मो ब्लू मॅट, डीप ब्लॅक मॅट रेड क्लेड आणि डीप ब्लॅक मॅट विथ ब्लॅक क्लेड हे मॅट पर्याय आहेत. क्रोम पर्यायाला मिस्टिक कॉपर म्हणतात.
(Jawa Motorcycles)ही मोटारसायकल डबल क्रॅडल चेसिसवर तयार करण्यात आली असून यात फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक फॉर्क आणि मागील बाजूस ट्विन शॉक अब्जॉर्बर्स प्री-लोड अॅडजस्जेबिलिटीसह देण्यात आले आहेत.
(Jawa Motorcycles)या मोटरसायकलमध्ये दुहेरी अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम देण्यात आली असून १७८ मिमीची ग्राऊंड क्लिअरन्स (वाहनाचा सर्वात खालचा पृष्ठभाग आणि जमिनीतील अंतर) देण्यात आलं आहे. जावा ४२ एफजे ३५० वर ब्रेकिंग ड्युटी ३२० मिमी फ्रंट डिस्क आणि २४० मिमी रियर डिस्कद्वारे केली जाते.
(Jawa Motorcycles)नवीन जावा ४२ एफजेचा अवतार स्टँडर्ड ४२ च्या तुलनेत अधिक आकर्षक आहे. यात इंधन टाकी वेगवेगळ्या डिझाइनसह येते. रंगाच्या निवडीनुसार ही डिझाइन वेगवेगळी आहे. नवीन ४२ एफजेमध्ये आसनाची रचनाही नवीन आणि आरामदायी आहे.
(Jawa Motorcycles)