सर्वात कमी चेंडूत १५० विकेट, १०० वर्षांतील सर्वोत्तम गोलंदाजी सरासरी, बुमराहने केले हे महापराक्रम-in pics jasprit bumrahs unplayable deliveries that rocked england in 2nd test ,फोटोगॅलरी बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  सर्वात कमी चेंडूत १५० विकेट, १०० वर्षांतील सर्वोत्तम गोलंदाजी सरासरी, बुमराहने केले हे महापराक्रम

सर्वात कमी चेंडूत १५० विकेट, १०० वर्षांतील सर्वोत्तम गोलंदाजी सरासरी, बुमराहने केले हे महापराक्रम

सर्वात कमी चेंडूत १५० विकेट, १०० वर्षांतील सर्वोत्तम गोलंदाजी सरासरी, बुमराहने केले हे महापराक्रम

Feb 03, 2024 10:23 PM IST
  • twitter
  • twitter
  • Jasprit Bumrah vs England : जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ६ फलंदाजांना बाद केले. फिरकीसाठी उपयुक्त असलेल्या खेळपट्टीवर बुमराह स्पेशल दिसला. बुमराहने ६ विकेट घेत अनेक विक्रमही केले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून (२ फेब्रुवारी) विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. आज (३ फेब्रुवारी) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव ३९६ धावांवर आटोपला.
share
(1 / 9)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून (२ फेब्रुवारी) विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. आज (३ फेब्रुवारी) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव ३९६ धावांवर आटोपला.(ANI )
प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांवर गारद झाला. भारताकडून जसप्रीत बुमराहने ४५ धावा देत ६ विकेट घेतले.
share
(2 / 9)
प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांवर गारद झाला. भारताकडून जसप्रीत बुमराहने ४५ धावा देत ६ विकेट घेतले.(AP)
जसप्रीत बुमराहने दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात शानदार गोलंदाजी केली. लंचनंतर बुमराहने जो रूट आणि ऑली पोप या दोन सर्वात महत्वाच्या फलंदाजांची शिकार केली आणि इंग्लंडला अडचणीत आणले.
share
(3 / 9)
जसप्रीत बुमराहने दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात शानदार गोलंदाजी केली. लंचनंतर बुमराहने जो रूट आणि ऑली पोप या दोन सर्वात महत्वाच्या फलंदाजांची शिकार केली आणि इंग्लंडला अडचणीत आणले.(REUTERS)
 बुमराहच्या अचूक यॉर्कर आणि स्विंग गोलंदाजीच्या जोरावर बुमराहने रूट, पोप, स्टोक्स आणि बेअरस्टोसह ६ विकेट काढल्या. या सोबतच बुमराहने कसोटीत १५० बळीही पूर्ण केले. या शानदार स्पेल दरम्यान बुमराहने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. 
share
(4 / 9)
 बुमराहच्या अचूक यॉर्कर आणि स्विंग गोलंदाजीच्या जोरावर बुमराहने रूट, पोप, स्टोक्स आणि बेअरस्टोसह ६ विकेट काढल्या. या सोबतच बुमराहने कसोटीत १५० बळीही पूर्ण केले. या शानदार स्पेल दरम्यान बुमराहने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. (AP)
सर्वात कमी चेंडूत १५० बळी- जसप्रीत बुमराह सर्वात कमी चेंडू गोलंदाजी करून १५० बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. त्याने कसोटीत ६७८१ चेंडूत १५० विकेट पूर्ण केले. त्याच्यानंतर उमेश यादवचा नंबर येतो. उमेशने ५६६१ चेंडूत १५० बळी पूर्ण केले होते.
share
(5 / 9)
सर्वात कमी चेंडूत १५० बळी- जसप्रीत बुमराह सर्वात कमी चेंडू गोलंदाजी करून १५० बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. त्याने कसोटीत ६७८१ चेंडूत १५० विकेट पूर्ण केले. त्याच्यानंतर उमेश यादवचा नंबर येतो. उमेशने ५६६१ चेंडूत १५० बळी पूर्ण केले होते.(AFP)
सर्वात वेगवान १५० विकेट घेणारा गोलंदाज- जसप्रीत बुमराह कसोटीत सर्वात कमी डावात १५० बळी घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने ६४व्या डावात १५० बळी पूर्ण केले. महान कपिल देव यांनी ६७ डावात १५० कसोटी बळी घेतले होते.
share
(6 / 9)
सर्वात वेगवान १५० विकेट घेणारा गोलंदाज- जसप्रीत बुमराह कसोटीत सर्वात कमी डावात १५० बळी घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने ६४व्या डावात १५० बळी पूर्ण केले. महान कपिल देव यांनी ६७ डावात १५० कसोटी बळी घेतले होते.(AFP)
घरच्या मैदानावर सर्वोत्तम कामगिरी- बुमराहने ४५ धावांत ६ फलंदाज बाद केले. घरच्या मैदानावरील ही त्याची सर्वोत्तम कसोटी कामगिरी आहे. तर ओव्हर ऑल तिसरी सर्वोत्तम कसोटी कामगिरी आहे. याशिवाय त्याने मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने ३३ विकेट्स घेतल्या होत्या तर किंग्स्टनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने २७ धावांत ६ विकेट घेतल्या होत्या.
share
(7 / 9)
घरच्या मैदानावर सर्वोत्तम कामगिरी- बुमराहने ४५ धावांत ६ फलंदाज बाद केले. घरच्या मैदानावरील ही त्याची सर्वोत्तम कसोटी कामगिरी आहे. तर ओव्हर ऑल तिसरी सर्वोत्तम कसोटी कामगिरी आहे. याशिवाय त्याने मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने ३३ विकेट्स घेतल्या होत्या तर किंग्स्टनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने २७ धावांत ६ विकेट घेतल्या होत्या.(ANI )
WTC मध्ये १०० विकेट घेणारा पहिला आशियाई वेगवान गोलंदाज-  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०१९ मध्ये सुरू झाली. अशात बुमराह हा WTC मध्ये १०० विकेट्स पूर्ण करणारा आशियातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे WTC मध्ये ८ गोलंदाजांनी बुमराहपेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. पण त्यापैकी कोणीही सरासरीच्या बाबतीत बुमराहच्या पुढे नाही.
share
(8 / 9)
WTC मध्ये १०० विकेट घेणारा पहिला आशियाई वेगवान गोलंदाज-  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०१९ मध्ये सुरू झाली. अशात बुमराह हा WTC मध्ये १०० विकेट्स पूर्ण करणारा आशियातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे WTC मध्ये ८ गोलंदाजांनी बुमराहपेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. पण त्यापैकी कोणीही सरासरीच्या बाबतीत बुमराहच्या पुढे नाही.(AP)
सरासरीच्या बाबतीतही अव्वल-  कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या १०० वर्षात १५० हून अधिक बळी घेतलेल्या गोलंदाजांमध्ये बुमराहची सरासरी सर्वात चांगली आहे. त्याने २०.२८ च्या सरासरीने १५० विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा ॲलन डेव्हिडसन येतो. डेव्हिसनची सरासरी २०.५३ आहे.
share
(9 / 9)
सरासरीच्या बाबतीतही अव्वल-  कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या १०० वर्षात १५० हून अधिक बळी घेतलेल्या गोलंदाजांमध्ये बुमराहची सरासरी सर्वात चांगली आहे. त्याने २०.२८ च्या सरासरीने १५० विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा ॲलन डेव्हिडसन येतो. डेव्हिसनची सरासरी २०.५३ आहे.(PTI)
इतर गॅलरीज