मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IND vs ENG 3rd Test : जैस्वाल ते जडेजा… राजकोटमध्ये या ५ खेळाडूंच्या मदतीने भारताने रचला इतिहास

IND vs ENG 3rd Test : जैस्वाल ते जडेजा… राजकोटमध्ये या ५ खेळाडूंच्या मदतीने भारताने रचला इतिहास

Feb 18, 2024 09:05 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • India Vs England Rajkot Test : टीम इंडियाने राजकोट कसोटीतही बॅझबॉलची हवा काढली आहे. भारताने राजकोट कसोटीत इंग्लंडचा ४३४ धावांनी पराभव केला. धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. ५५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ केवळ १२२ धावांत गारद झाला.

हैदराबादमधील पहिली कसोटी हरल्यानंतर भारताने मालिकेत शानदार पुनरागमन केले आहे. विशाखापट्टणमनंतर आता टीम इंडियाने राजकोट कसोटीतही बॅझबॉलची हवा काढली आहे. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 8)

हैदराबादमधील पहिली कसोटी हरल्यानंतर भारताने मालिकेत शानदार पुनरागमन केले आहे. विशाखापट्टणमनंतर आता टीम इंडियाने राजकोट कसोटीतही बॅझबॉलची हवा काढली आहे. (ANI)

भारताने राजकोट कसोटीत इंग्लंडचा ४३४ धावांनी पराभव केला. धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. ५५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ केवळ १२२ धावांत गारद झाला.
twitterfacebookfacebook
share

(2 / 8)

भारताने राजकोट कसोटीत इंग्लंडचा ४३४ धावांनी पराभव केला. धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. ५५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ केवळ १२२ धावांत गारद झाला.(PTI)

भारत आता मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. सामन्यात भारताच्या विजयाचे ५ हिरो ठरले. या ५ खेळाडूंमुळेच टीम इंडियाने हा कसोटी सामना सहज जिंकला.
twitterfacebookfacebook
share

(3 / 8)

भारत आता मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. सामन्यात भारताच्या विजयाचे ५ हिरो ठरले. या ५ खेळाडूंमुळेच टीम इंडियाने हा कसोटी सामना सहज जिंकला.(PTI)

शुभमन गिल- पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात शुभमन गिलने शानदार फलंदाजी केली. त्याने १५१ चेंडूत ९१ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून ९ चौकार आणि २ षटकार आले.
twitterfacebookfacebook
share

(4 / 8)

शुभमन गिल- पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात शुभमन गिलने शानदार फलंदाजी केली. त्याने १५१ चेंडूत ९१ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून ९ चौकार आणि २ षटकार आले.(ANI)

रवींद्र जडेजा- भारतीय संघाचा स्टार आणि अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने अप्रतिम कामगिरी केली. जड्डूने पहिल्या डावात शतक (११२) झळकावले आणि  यानंतर २ विकेट्सही घेतल्या. यानंतर जडेजाने दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेतल्या.
twitterfacebookfacebook
share

(5 / 8)

रवींद्र जडेजा- भारतीय संघाचा स्टार आणि अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने अप्रतिम कामगिरी केली. जड्डूने पहिल्या डावात शतक (११२) झळकावले आणि  यानंतर २ विकेट्सही घेतल्या. यानंतर जडेजाने दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेतल्या.(PTI)

रोहित शर्मा- भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सामन्याच्या पहिल्या डावात दमदार शतक झळकावले. रोहितने पहिल्या डावात १९६ चेंडूत १३१ धावांची खेळी केली, ज्यात त्याने १४ चौकार आणि ३ षटकार मारले.
twitterfacebookfacebook
share

(6 / 8)

रोहित शर्मा- भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सामन्याच्या पहिल्या डावात दमदार शतक झळकावले. रोहितने पहिल्या डावात १९६ चेंडूत १३१ धावांची खेळी केली, ज्यात त्याने १४ चौकार आणि ३ षटकार मारले.(PTI)

सरफराज खान-भारताकडून पदार्पणाची कसोटी सरफराज खाननेही आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. त्याने दोन्ही डावात अर्धशतके झळकावली. सरफराजने पहिल्या डावात ६२ आणि दुसऱ्या डावात नाबाद ६८ धावा केल्या.
twitterfacebookfacebook
share

(7 / 8)

सरफराज खान-भारताकडून पदार्पणाची कसोटी सरफराज खाननेही आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. त्याने दोन्ही डावात अर्धशतके झळकावली. सरफराजने पहिल्या डावात ६२ आणि दुसऱ्या डावात नाबाद ६८ धावा केल्या.(BCCI-X)

यशस्वी जैस्वाल - २२ वर्षीय यशस्वी जैस्वालचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. त्याने सलग दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावले. सामन्याच्या दुसऱ्या डावात जैस्वालने २३६ चेंडूंचा सामना करत नाबाद २१४ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून १४ चौकार आणि १२ षटकार आले. 
twitterfacebookfacebook
share

(8 / 8)

यशस्वी जैस्वाल - २२ वर्षीय यशस्वी जैस्वालचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. त्याने सलग दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावले. सामन्याच्या दुसऱ्या डावात जैस्वालने २३६ चेंडूंचा सामना करत नाबाद २१४ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून १४ चौकार आणि १२ षटकार आले. (BCCI-X)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज