भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०१५ मध्ये बीएमडब्ल्यू एक्स १ लाँग व्हीलबेस इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात आली. या कारची सुरुवाती किंमत ४९ लाख रुपये आहे. ही कार एकदा चार्ज केल्यानंतर ५३१ किमी धावणार, असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे.
मेड इन इंडिया असणारे कंपनीचे हे पहिले इलेक्ट्रिक वाहन असून तामिळनाडूतील चेन्नई येथील बीएमडब्ल्यू समूहाच्या प्रकल्पात या कारची निर्मिती केली जाणार आहे.
नवीन बीएमडब्ल्यू एक्स १ एलडब्ल्यूबी इलेक्ट्रिक कार शार्प फ्रंट-एंड डिझाइन आणि वाढीव इंटिरियर स्पेससह येते. या कारची लांबी ४ हजार ६१६ मिमी असून व्हीलबेस २,८०० मिमी आहे. बीएमडब्ल्यू एक्स १ एलडब्ल्यूबी इलेक्ट्रिक कारमध्ये अॅल्युमिनियम सॅटिनेटेड रूफ रेलसह लांब रूफलाइन देण्यात आले.