भारत मोबिलिटी ग्लोबल ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये बीएमडब्ल्यू कंपनीनं बीएमडब्ल्यू एफ 450 जीएस ही नवीन मोटारसायकल लाँच केली आहे. भारतात या मोटारसायकलची निर्मिती टीव्हीएस कंपनी करणार आहे.
बीएमडब्ल्यू एफ ४५० जीएस कन्सेप्ट ही बाईस ईआयसीएमए २०२४ शोमध्ये पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आली होती आणि आता ती भारतातील ऑटो एक्स्पो २०२५ मध्येही दाखल झाली आहे.
या मोटारसायकलचं वजन १७५ किलो ग्रॅम असून चाकांवर कमीत कमी वजन पडण्याच्या दृष्टीनं तिची रचना करण्यात आली आहे. मागील बाजूस मोनो-शॉक असून त्यात लोड-डिपेंडेंट डम्पिंग आहे.
बाइकमध्ये ६.५ इंचाचा टीएफटी डिस्प्ले आहे. हा ब्लूटूथच्या माध्यमातून स्मार्टफोनशी सहज कनेक्ट होतो. कॉल आणि एसएमएस अलर्ट, मीडिया कंट्रोल आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनचीही यात सोय आहे.