एथर एनर्जीने भारतात त्यांच्या कम्युनिटी दिवसानिमित्त Halo स्मार्ट हेल्मेट बाजारात आणले आहे. या हेल्मेटची किंमत भारतीय बाजारात १२,९९९ रुपये आहे. तर Halo Bit, Ather च्या हाफ-फेस हेल्मेटचे मॉड्यूल ४,९९९ रुपयांना बाजारात कंपनीतर्फे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
एथर एनर्जीच्या नवीन Halo स्मार्ट हेल्मेटमध्ये WearDetect तंत्रज्ञान हे खास वैशिष्ठ्ये आहे. हे हेल्मेट घातल्यावर आपोआप चालू होऊन ते तुमच्या मोबाईल फोनशी कनेक्ट होते.
एथर एनर्जीचे Halo हेल्मेटमध्ये Harman Kardon चे स्पीकर वापरण्यात आले आहे. यामुळे चालकाला उच्च-गुणवत्तेचा ऑडिओचा अनुभव या स्मार्ट हेल्मेटच्या माध्यमातून घेता येणार आहे.
हरमन कार्डनच्या स्पीकर्ससह सुसज्ज असलेले अथर हॅलो स्मार्ट हेल्मेट उच्च-गुणवत्तेच्या ऑडिओची अनुभव वाहनचालकांना देते. याव्यतिरिक्त या हेल्मेटमध्ये WearDetect तंत्रज्ञान आहे, जे घातल्यावर आपोआप चालू होते आणि तुमच्या मोबाइल फोनशी आपोपाप कनेक्ट होते.
हे स्मार्ट हेल्मेट चालकाने कधी घातले याची देखील माहिती सांगते. वाहन चालवतांना हे हेल्मेट चालकाला अनेक गोष्टींची माहिती देते. तसेच संभाव्य धोक्यांची आणि वातावरणाची माहिती देखील या स्मार्ट हेल्मेटद्वारे मिळू शकते.
अथर हॅलो स्मार्ट हेल्मेटमध्ये चिट चॅट नावाचे फीचर देण्यात आले आहे. हे फीचर चालकाला वाहन चालवतांना हेल्मेट-टू-हेल्मेट संवाद साधण्यास मदत करते.
अथरने तयार केलेले हे हेल्मेट आयएसआय आणि डॉट तंत्रज्ञानाने प्रमाणित केले आहे. कंपनीने हाफ-फेस हेल्मेट देखील तयार केले आहे, हे हेल्मेट लवकरच सर्व ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध होणार आहे. हे हेल्मेट Halo Bit सारखे राहणार आहे.
अथर हॅलो स्मार्ट हेल्मेट दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. हेल्मेट स्कूटरला देखील जोडता येणार आहे. त्यामुळे रायडर स्कूटरच्या डाव्या स्विचगियरवर असलेल्या जॉयस्टिकद्वारे हे हेल्मेट नियंत्रित करू शकेल, अशी सुविधा यात देण्यात आली आहे.