भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना शुक्रवार (२३ फेब्रुवारी) रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने पहिल्या डावात ७ बाद ३०२ धावा केल्या. जो रूट १०६ धावा तर ऑली रॉबिन्सन ३१ धावांवर नाबाद आहेत.
(PTI)तत्पूर्वी, या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी इंग्लंडला दमदार सुरुवात करून दिली. बेन डकेट (११) धावा करून नवोदित आकाश दीपच्या चेंडूवर यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकरवी झेलबाद झाला.
(AP)त्यावेळी इंग्लंडची धावसंख्या ४७ होती. यानंतर याच षटकात दोन चेंडूंनंतर ऑली पोप शून्यावर बाद झाला. यानंतर इंग्लंडच्या धावसंख्येत आणखी १० धावांची भर पडली आणि क्रॉली (४२) आकाश दीपच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. ५७ धावांवर तीन विकेट पडल्यानंतर जॉन बेअरस्टो आणि जो रूट यांनी मिळून ५२ धावा जोडल्या.
(AP)बेअरस्टो सेट दिसत होता, पण आर. अश्विनच्या चेंडूवर स्वीप करण्याच्या प्रयत्नात तो एलबीडब्ल्यू आऊट झाला. त्यानंतर बेन स्टोक्सला रवींद्र जडेजाने पॅव्हेलियनमध्ये परतवले.
(PTI)११२ धावांवर ५ विकेट पडल्यानंतर जो रूट आणि बेन फॉक्स यांनी मिळून डाव सांभाळला. रूट-फॉक्सने बॅझबॉल सोडून आपला नैसर्गिक खेळ केला आणि सहाव्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली.
(PTI)पण फॉक्सचे अर्धशतक ३ धावांनी हुकले. फॉक्सला मोहम्मद सिराजने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. फॉक्सनंतर सिराजने टॉम हार्टलीलाही बाद केले.
(REUTERS)यानंतर इथून जो रूट आणि ऑली रॉबिन्सन यांनी आणखी विकेट पडू दिल्या नाहीत. रुटने आपल्या शतकी खेळीत आतापर्यंत २२६ चेंडूंचा सामना केला असून त्यात ९ चौकारांचा समावेश आहे. रुटचे कसोटी कारकिर्दीतील हे ३१वे शतक आहे तर भारताविरुद्धचे १०वे शतक आहे. रुट आता भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे.
(AFP)आकाश दीपचे स्वप्नवत पदार्पण- आकाश दीपने या सामन्यातून कसोटी पदार्पण केले. भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारा तो ३१३ वा खेळाडू ठरला आहे.
(PTI)