मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  जैस्वालच्या द्विशतकानंतर बुमराहचे ६ विकेट, दुसऱ्या कसोटीवर भारताची मजबूत पकड

जैस्वालच्या द्विशतकानंतर बुमराहचे ६ विकेट, दुसऱ्या कसोटीवर भारताची मजबूत पकड

Feb 03, 2024 08:16 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • India vs England 2nd Test Day 2 Highlights : भारत आणि इंग्लंड कसोटीचा आज (३ फेब्रुवारी) दुसरा दिवस होता. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात बिनबाद २८ धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा १३ तर यशस्वी जैस्वाल १५ धावांवर नाबाद परतले. भारताकडे आता १७१ धावांची आघाडी झाली आहे. 

भारताने पहिल्या डावात यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या (२०९) जोरावर ३९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांवर गारद झाला. यशस्वी जैस्वालने २९० चेंडूत २०९ धावांची शानदार खेळी केली. त्याने १९ चौकार आणि ७ षटकार ठोकले. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 9)

भारताने पहिल्या डावात यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या (२०९) जोरावर ३९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांवर गारद झाला. यशस्वी जैस्वालने २९० चेंडूत २०९ धावांची शानदार खेळी केली. त्याने १९ चौकार आणि ७ षटकार ठोकले. (PTI)

इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने २५ धावांत तीन बळी घेतले. शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनीही प्रत्येकी ३ बळी घेतले. पहिल्या सामन्याचा हिरो असलेल्या टॉम हार्टलीला एक विकेट मिळाली.
twitterfacebookfacebook
share

(2 / 9)

इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने २५ धावांत तीन बळी घेतले. शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनीही प्रत्येकी ३ बळी घेतले. पहिल्या सामन्याचा हिरो असलेल्या टॉम हार्टलीला एक विकेट मिळाली.(PTI)

भारताच्या ३९६ धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडनेही चांगली सुरुवात केली होती. त्यांनी पहिल्या विकेटसाठी पन्नास धावा जोडल्या. पण यानंतर लागोपाठ विकेट गमावल्या. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात जॅक क्रॉलीने त्याची विकेट फेकली. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 9)

भारताच्या ३९६ धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडनेही चांगली सुरुवात केली होती. त्यांनी पहिल्या विकेटसाठी पन्नास धावा जोडल्या. पण यानंतर लागोपाठ विकेट गमावल्या. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात जॅक क्रॉलीने त्याची विकेट फेकली. (ANI )

एकेकाळी इंग्लिश संघही पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत होते, पण वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडचे कंबरडे मोडले. कुलदीप यादवने बुमराहला चांगली साथ दिली. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 9)

एकेकाळी इंग्लिश संघही पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत होते, पण वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडचे कंबरडे मोडले. कुलदीप यादवने बुमराहला चांगली साथ दिली. (PTI)

इंग्लंडकडून पहिल्या डावात जॅक क्रॉलीने ७८ चेंडूंचा सामना करताना सर्वाधिक ७६ धावा केल्या. ज्यामध्ये ११ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 9)

इंग्लंडकडून पहिल्या डावात जॅक क्रॉलीने ७८ चेंडूंचा सामना करताना सर्वाधिक ७६ धावा केल्या. ज्यामध्ये ११ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. (REUTERS)

क्रॉलीच्या विकेटमुळे इंग्लंडसाठी अडचणी निर्माण झाल्या. यानंतर इंग्लंडने जो रूट आणि ओली पोपच्या रूपाने लागोपाठ दोन विकेट गमावल्या. यानंतर इंग्लंडचा डाव शेवटपर्यंत सावरू शकला नाही.
twitterfacebookfacebook
share

(6 / 9)

क्रॉलीच्या विकेटमुळे इंग्लंडसाठी अडचणी निर्माण झाल्या. यानंतर इंग्लंडने जो रूट आणि ओली पोपच्या रूपाने लागोपाठ दोन विकेट गमावल्या. यानंतर इंग्लंडचा डाव शेवटपर्यंत सावरू शकला नाही.(REUTERS)

क्रॉलीशिवाय इंग्लंडच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही. ४७ धावा करणारा बेन स्टोक्स संघाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता.
twitterfacebookfacebook
share

(7 / 9)

क्रॉलीशिवाय इंग्लंडच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही. ४७ धावा करणारा बेन स्टोक्स संघाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता.(AP)

यानंतर भारताला पहिल्या डावाच्या जोरावर १५३ धावांची आघाडी मिळाली. भारताकडून जसप्रीत बुमराहने ४५ धावांत ६ विकेट घेतल्या. तर कुलदीप यादवने ३ विकेट मिळवले.
twitterfacebookfacebook
share

(8 / 9)

यानंतर भारताला पहिल्या डावाच्या जोरावर १५३ धावांची आघाडी मिळाली. भारताकडून जसप्रीत बुमराहने ४५ धावांत ६ विकेट घेतल्या. तर कुलदीप यादवने ३ विकेट मिळवले.(REUTERS)

भारताने दुसऱ्या डावात बिनबाद २८ धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा १३ तर यशस्वी जैस्वाल १५ धावांवर नाबाद परतले.
twitterfacebookfacebook
share

(9 / 9)

भारताने दुसऱ्या डावात बिनबाद २८ धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा १३ तर यशस्वी जैस्वाल १५ धावांवर नाबाद परतले.(AFP)

WhatsApp channel

इतर गॅलरीज