बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला ही गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासून लांब आहे. ‘इश्क’, ‘येस बॉस’,’दिवाना मस्ताना’ यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट देणारी जुही ९०च्या दशकात अतिशय लोकप्रिय होती. तुम्हाला माहितीये का बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने अवघ्या ६ वर्षांचा असताना तिला प्रपोज केला होता. तिने स्वत: याबाबतचा खुलासा केला होता.
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून आमिर खानचा पुतण्या इमरान खान आहे. हो तुम्ही बरोबर ऐकले. आज १३ डिसेंबर रोडी इमरान खानचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आपण जाणून घेऊया जुहीने याबाबत काय सांगितले होते.
जुही ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तीने एकदा इमरान खानचा लहानपणीचा आणि मोठेपणीचा फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले होते.
जुहीने फोटो शेअर करत “इमरानने वयाच्या ६ व्या वर्षी मला प्रपोज केले होते. तेव्हापासून त्याला खरा हिरा ओळखण्याची समज आहे. माझ्या आतापर्यंतच्या सर्वात लहान आणि तरुण बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा,” असे म्हटले होते.
इमरानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्याने ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात आमिर खानच्या बालपणीची भूमिका साकारली होती. ‘जो जीता वही सिकंदर’ मध्येही बालकार म्हणून दिसला होता. ‘जाने तू… या जाने ना’, ‘लक’, ‘आय हेट लव्ह स्टोरीज’, ‘दिल्ली बेली’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ आणि ‘एक मैं और एक तू’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले