बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड नफा कमावतात, तर अनेक चित्रपट कधी प्रदर्शित होतात हेच कळत देखील नाही. आज आम्ही तुम्हाला अशा चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे प्रेक्षकांना इतके आवडले की, ते वर्षानुवर्षे थिएटरमध्ये सुरू होते. चला तर मग जाणून घेऊया अशा चित्रपटांबद्दल ज्यांनी रिलीज झाल्यानंतर पडद्यावर टिकून राहण्याचा जबरदस्त विक्रम केला आहे.
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि काजोलचा आयकॉनिक चित्रपट 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' प्रेक्षकांना खूप आवडला होता. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा सर्वात जास्त काळ चाललेला चित्रपट आहे. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेला 'डीडीएलजे' गेल्या ३० वर्षांपासून मुंबईतील मराठा मंदिर थिएटरमध्ये सुरू आहे. त्याचा शो सकाळी ११:३० वाजता दाखवला जातो.
रमेश सिप्पी दिग्दर्शित 'शोले' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील कल्ट क्लासिक चित्रपटांमध्ये गणला जातो. या चित्रपटाची कथाच नाही तर त्यातील संवाद आणि गाणीही खूप आवडली. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, संजीव कुमार, अमजद खान आणि जया बच्चन यांसारख्या दिग्गज कलाकारांनी यात एकत्र काम केले होते. हा चित्रपट २८६ आठवडे म्हणजेच ५ वर्षांहून अधिक काळ थिएटरमध्ये चालला होता.
ज्ञान मुखर्जी दिग्दर्शित 'किस्मत'मध्ये अशोक कुमार आणि मुमताज यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट ९ जानेवारी १९४३ रोजी प्रदर्शित झाला. 'किस्मत' १८७ आठवडे म्हणजेच ३ वर्षांहून अधिक काळ थिएटरमध्ये चालला.
'मुघल-ए-आझम' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. दिलीप कुमार, मधुबाला आणि पृथ्वीराज कपूर अभिनीत हा चित्रपट सुमारे १५० आठवडे म्हणजेच ३ वर्षे थिएटरमध्ये चालला.
बॉलिवूड शोमन राज कपूर दिग्दर्शित 'बरसात' हा चित्रपटही या यादीत सामील आहे. या चित्रपटात राज कपूर व्यतिरिक्त नर्गिस मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट १०० आठवडे म्हणजेच २ वर्षे थिएटरमध्ये चालला.
सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांचा 'हम आपके हैं कौन' हा चित्रपट ५० आठवडे म्हणजेच १ वर्ष थिएटरमध्ये चालला.
आमिर खान आणि करिश्मा कपूर अभिनीत 'राजा हिंदुस्तानी' चित्रपटाचे नावही या यादीत समाविष्ट आहे. हा चित्रपट ५० आठवडे म्हणजेच १ वर्ष थिएटरमध्ये चालला.
हृतिक रोशन आणि अमीषा पटेल यांचा 'कहो ना प्यार है' हा चित्रपटही प्रेक्षकांना खूप आवडला. हा चित्रपट जवळजवळ १ वर्ष म्हणजे ५० आठवडे थिएटरमध्ये चालला.
या यादीत शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांचा 'मोहब्बतें' हा चित्रपट आहे. हा चित्रपट ५० आठवडे म्हणजेच १ वर्ष थिएटरमध्ये चालला.