बॉलिवूडमधील अनेक सिनेमे जे देशभक्तीवर आधारित आहेत. उद्या २६ जानेवारी आहे. त्यानिमित्ताने अनेकांना घरबसल्या देशभक्तीपर सिनेमे पाहायचे असतील. चला जाणून घेऊया हे सिनेमे कुठे आणि कसे पाहाता येणार?
या यादीत शाहरुख खानचा स्वदेश हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट 2004 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील अभिनेत्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. त्याला IMDB वर 8.2 रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
मनोज बाजपेयी, रवी किशन यांचा १९७१ हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला ८.२ रेटिंग आहे.
आमिर खानचा 'रंग दे बसंती' हा चित्रपट कोणी कसा विसरेल? या चित्रपटात आमिरसोबत सोहा अली खानही मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाला ८.१ रेटिंग आहे.
या यादीत आमिर खानच्या लगानचाही समावेश आहे. या चित्रपटाला अनेक मोठे पुरस्कार मिळाले. या चित्रपटाला ८.१ रेटिंग आहे.