जर तुम्ही बॉलिवूडचे चाहते असाल तर आम्ही तुम्हाला अशा सिनेमांविषयी सांगणार आहोत ज्यांना सर्वाधिक रेटिंग मिळाले आहे. हे चित्रपट तुम्हाला देखील आवडतील चला जाणून घेऊया या यादीत कोणते सिनेमे आहेत.
१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेवर आधारित ब्लॅक फ्राइडे या चित्रपटाचे रेटिंग ८.४ आहे. हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.
१९९८ मध्ये रिलीज झालेल्या सत्या सिनेमाला ८.३ रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट तुम्ही सोनी लिव्ह आणि प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
२००६मधील विनोदी चित्रपट खोसला का घोसलाला ८.२ ची IMDb रेटिंग आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
पान सिंग तोमर हा सिनेमा २०१२मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बायोपिक ड्रामा चित्रपट होता. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
उडाण हा सिनेमा २०१०मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे IMDB रेटिंग ८.१ आहे. तुम्ही नेटफ्लिक्सवर चित्रपट पाहू शकता.
अ वेडनेसडे हा चित्रपट २००८मध्ये चर्चेत होता. या चित्रपटाचे रेटिंग हे ८.१ आहे. तुम्ही नेटफ्लिक्सवर चित्रपट पाहू शकता.