Mumbai Rain Updates : जुलै महिना संपल्यापासून मुंबईसह कोकणातून अचानक पाऊस गायब झाला आहे. त्यामुळं मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु आता हवामानात सतत बदल होत असल्याचं दिसून येत आहे.
(HT)गेल्या आठवड्यापासून मुंबईतील तापमाना वाढलं होतं. त्यामुळं नागरिक उकाड्याने हैराण झाले. त्यानंतर आता मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
(HT)पुढील ४८ तासांत मुंबईसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
(HT)गेल्या १३ ऑगस्टपासून पावसाळी वाऱ्यांसाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं महाराष्ट्रात पावसाचं पुनरागमन होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे.
(Pappi Sharma)