Maharashtra Weather Update : सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं सामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांतून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. पाऊस गायब झाला असून राज्यातील अनेक ठिकाणी थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचं तापमान झपाट्याने खालावलं आहे. संध्याकाळी सहा वाजेपासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत थंडी पडत आहे. तसेच धुक्यानेही हजेरी लावली आहे.
(Hindustan Times)मध्य महाराष्ट्रात हळूहळू थंडी वाढत असली तरी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.