
Mumbai Weather Updates : उत्तरेकडील राज्यांसह महाराष्ट्रातून मान्सून माघारी परतला आहे. त्यामुळं राज्यातील अनेक शहरांच्या हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे.
(HT PHOTO)हवामानात बदल होत असतानाच आता मुंबईकरांचा घाम काढणारी बातमी समोर आली आहे. पुढील काही दिवसांत ठाण्यासह मुंबईतील अनेक ठिकाणी उष्णतेत वाढ होणार आहे. परिणामी मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.
(HT PHOTO)येत्या काही दिवसांत तेज चक्रिवादळ मुंबईसह कोकणच्या किनारी भागांमध्ये धडकणार आहे. त्यामुळं मुंबईसह किनारी भागातील तापमानात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
(HT PHOTO)पुढील दोन ते तीन दिवसांत मध्य महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाजही आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे.
(HT PHOTO)

