Mumbai Rain Update : उत्तरेकडील राज्यांमध्ये होत असलेल्या पावसाचा परिणाम राज्यातील हवामानावरही होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं आता हवामान खात्याने महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे.
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
(1 / 5)
Mumbai Rain Update : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह ठाणे, पालघर आणि नवी मुंबईच्या हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.(HT)
(2 / 5)
Maharashtra Rain Updates : उत्तरेकडील राज्यांमध्ये बदलत असलेल्या हवामानाचा प्रभाव महाराष्ट्र आणि परिणामी मुंबईतील हवामानावरही दिसून येत आहे. मुंबईत ढगाळ वातावरण तयार झालं असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.(HT)
(3 / 5)
पुढील दोन ते तीन दिवसांत मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.(AP)
(4 / 5)
Maharashtra Rain Update : गेल्या आठवड्यापासून मुंबईच्या तापमानात सतत वाढ होत होती. परिणामी मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात उकाड्याचा सामना करावा लागला होता. परंतु हवामानात गारवा निर्माण झाल्याने शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.(Sai Saswat Mishra)
(5 / 5)
कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पुढील २४ तासांत पावसाची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी हवामान पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे.(PTI)