Mumbai Rain Update : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईतील हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे.
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
(1 / 5)
Maharashtra Rain Update : दोन ते तीन दिवसांपासून मुंबईतील हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मुंबईकर सुखावले आहे.(Sai Saswat Mishra)
(2 / 5)
मुंबईतील अनेक ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली असून त्यामुळं नागरिकांना रेनकोट व छत्र्या बाहेर काढाव्या लागल्या आहे. परंतु आता मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.(PTI)
(3 / 5)
Mumbai Rain and Weather Update : हवामान खात्याने मुंबईसह ठाणे, पालघर आणि नवी मुंबईत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. आजपासून पुढील दोन दिवस मुंबईतील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.(AP)
(4 / 5)
मुंबईमध्ये ढगाळ वातावरण तयार झालं आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झाली आहे.(AP)
(5 / 5)
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळं ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये चक्रिय स्थिती तयार झाली आहे. त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या वातावरणावरही होणार आहे. त्यामुळं पुढील दोन ते तीन दिवसांत मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.(PTI)