Maharashtra Rain Updates : गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेला पाऊस आता मुंबईत सक्रिय होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
(HT)अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग कमी होत असल्याने मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघरसह नाशिक जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
(PTI)किनारपट्टी आणि पश्चिम घाटात दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळं पुढील दोन ते तीन दिवसांत मुंबईसह उपनगरांच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
(HT)याशिवाय पुणे, नाशिक, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचं आयएमडीकडून सांगण्यात आलं आहे.
(PTI)