Mumbai Rain Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या किनारी भागातील हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं सामान्यांच्या चिंता वाढल्या आहे.
(HT)Kokan Weather Update : बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्राच्या दिशेने येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढला आहे. परिणामी पुढील तीन दिवस कोकणच्या किनारी भागांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
(Shyamal Maitra)Maharashtra Weather Update : सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर मुंबईतील काही भागांमध्ये रिमझिम पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळं आता ऐन हिवाळ्यात मुंबईकरांना पावसाचा आनंद घेता येणार आहे.
(PTI)मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बाष्पयुक्त वाऱ्यामुळं ढगाळ वातावरण तयार झालं आहे. त्यामुळं काही ठिकाणी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. किनारी भाग सोडून राज्यातील अन्य भागांमधील हवामान प्रामुख्याने कोरडं राहणार आहे.
(Sai Saswat Mishra)